Sunday, July 31, 2011

थांबाहो ...मी लिहितो आहे .......

जुन्या पुराण्या कवीचे
कविता संग्रह चाळतो आहे

शब्दांवर बसलेल्या धुळीत
झटकून झटकून लोळतो आहे

एक प्रयत्न लिहिण्याचा पुन्हा पुन्हा करतो आहे
थांबाहो ...मी लिहितो आहे ...........

साहित्याचा खरडून गंध हुंगतो आहे
लक्ष्मण रेषेवर लिहून ती लांघतो आहे

डगमगता शब्दांचाच पूल बांधतो आहे
जमेल जमेल म्हणून स्वतःला सांगतो आहे

विचारांना डोक्याच्या खलात कांडतो आहे
अरे जरा.. थांबाहो ....मी लिहितो आहे...

सूर्याच्या आगीत..वाहणाऱ्या नदीत
यमक बिमक.. आधार घेऊन पोहतो आहे

कसं बस का होईना हातचा एक लावतो आहे
रिकाम्या ओळीत माझा शब्द शब्द धावतो आहे

अर्थहीन जरी.. दिसायला सुंदर म्हणून भावतो आहे
थांबाहो .......मी लिहितो आहे ......

कवींच्या भाऊगर्दीत नवकवी म्हणून
कोपऱ्या कोपरयाने मी मावतो आहे

प्रेमाच्या.. कधी गंभीर..मोडक्या तोडक्या कवितांच्या
भरवश्यावर नावाच्या पुढे "कवी" लावतो आहे
.........................
...........................
थांबाहो .........मी लिहितो आहे .......

No comments:

Post a Comment