सांग ना राधे तू रूसलीस का
मुख फिरवून गं बसलीस का
आभास झाला का मोहनाचा
चुकला का ठोका काळजाचा
तूझ्याच हाकेला ओ देईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
किती वाट पाहशील श्रीरंगाची
किती ओढ लागली नभरंगाची
तो जाहला असे कोठेसे दंग
सर्वास प्रिय असे त्याचा संग
तरी तयाची सानिका तूच गं
साद देवूनी पहा तो येईल गं
असेल खट्याळ हसू तव नयनी
बघेल जरी तो जाई मन मोहुनी
मनी कृष्णी नाव तुझेच राधे
झुरे ते तर तुझ्यासाठीच राधे
येई तो जवळ तूला घेईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
No comments:
Post a Comment