जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाही......
जवळ असताना मात्र ऐकमेकांशी पटत नाही....
कळतं सार पण वळत नाही......
खरचं काय असते मैत्री ते दुर गेल्याशिवाय कळत नाही...
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..
आनंद दाखवण्यासाठी हसायची गरज नसते..
दु : ख दाखवायला आसवांची गरज नसते..
न बोलता ज्यामध्ये सगळे समजते ती म्हणजे मैत्री........
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
No comments:
Post a Comment