पून्हा एकदा
आरोप प्रत्यारोप
रोख नेमका पण
प्रश्नच प्रश्न.. सैरभैर
तू हवासच.. गुन्हेगार लागतोच केस चालवताना
तूच नकोस.. सग्गळं तुझ्यामुळेच झालं
प्रचंड रोष अगदी जळजळणारा
अव्यक्त आकांत.. कानाठाळ्या बसवणारा...
..कित्ती काही मावतं नाही दोन डोळ्यात.. पूढे मात्र
थरथरत्या बंद ओठांवर एक ओघळ... अन.. गून्हा कबूल... पून्हा एकदा!!
No comments:
Post a Comment