जुन्या पुराण्या कवीचे
कविता संग्रह चाळतो आहे
शब्दांवर बसलेल्या धुळीत
झटकून झटकून लोळतो आहे
एक प्रयत्न लिहिण्याचा पुन्हा पुन्हा करतो आहे
थांबाहो ...मी लिहितो आहे ...........
साहित्याचा खरडून गंध हुंगतो आहे
लक्ष्मण रेषेवर लिहून ती लांघतो आहे
डगमगता शब्दांचाच पूल बांधतो आहे
जमेल जमेल म्हणून स्वतःला सांगतो आहे
विचारांना डोक्याच्या खलात कांडतो आहे
अरे जरा.. थांबाहो ....मी लिहितो आहे...
सूर्याच्या आगीत..वाहणाऱ्या नदीत
यमक बिमक.. आधार घेऊन पोहतो आहे
कसं बस का होईना हातचा एक लावतो आहे
रिकाम्या ओळीत माझा शब्द शब्द धावतो आहे
अर्थहीन जरी.. दिसायला सुंदर म्हणून भावतो आहे
थांबाहो .......मी लिहितो आहे ......
कवींच्या भाऊगर्दीत नवकवी म्हणून
कोपऱ्या कोपरयाने मी मावतो आहे
प्रेमाच्या.. कधी गंभीर..मोडक्या तोडक्या कवितांच्या
भरवश्यावर नावाच्या पुढे "कवी" लावतो आहे
.........................
...........................
थांबाहो .........मी लिहितो आहे .......

Sunday, July 31, 2011
"भास तुझा"
त्या गंधीत फुलांप्रमाणे तव कांती मज भासली
स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस
त्या रिमझिमणार्या पाऊस धारा
अंगी जागला शहारी प्रदेश सारा
जणू सुरेख मोर पिसारा
त्यात भासे तुझा गोड चेहरा
प्रित कळी उरी ऊमलली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस
मंद झुळूक ते वार्याचे
गीत गाई तुझे-माझे
भास होता तु येण्याचे
श्वास वाढ्ती स्पंदनांचे
वसुंधरा ही श्रूंगार ल्याली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस
गालीचे मग हरिताचे सुने-सुने बनती
परतीची वाट जेव्हा पद वळती
ओहळाची आसवे मग खळखळती
मधुर संगीत त्यांचे गगनी भिडती
आनंदास आज भरती आली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

जीवनाचे गणित
जीवनाचे गणित
वाटत असते अंधाराची रात्र आता नाही उजळणार
जिवनाचे हे गणित कधीच नाही सुटणार
तरीही अचानक आयुष्यात एक दिवस असा येतो
या सगळ्या गोष्ठींचा चेहरा मोहराच बदलुन जातो
कुठुन तरी कुठलातरी एक कवी येतो
त्या गणितातुन जिवनाचे गाणेच गाऊन जातो
आणि मग
आजवर न उलगडलेले कोडे हळुवार उलगडते
निराशेचा अंधार संपतो अन जिवन सारं उजळु लागते

मराठी माणूस आहे, मी चाल माझी वाघाची
मराठी माणूस आहे, मी चाल माझी वाघाची
कोणासही न जुमानणारी नजर आहे रागाची !
...येथल्या काळ्या मातीचा गर्व आहे मजला भारी
देव मानतो विठोबाला करतो पंढरीची वारी !
माझाच आहे सह्याद्री आणि त्याच्या पर्वत रांगा
कृष्ण कोयना वेण्णा यांना मानतो आम्ही गंगा !
मराठी रयतेचा आहे शिवबाच फक्त जाणता राजा
मुलुख सारा मावळ्यांचा करतो आजही गाजा वाजा !
येथल्या मातीत आहे समतेचे सारे पाणी
शाहू फुले आंबेडकरांची गातात येथेच गाणी !
अजूनही ओळखले नसले तर आता तरी जाणा
मराठी बाणा आमच्या ह्रदयातील काळीज माना !
'होय फक्त मराठीच' पुन्हा एकदा ठणकावून सांगतो
तरीही ज्ञानोबा तुकोबांच्या शांतीचे पसायदान मागतो !
महाराष्ट्राचे गर्व गीत आम्ही जोराने गाणार
मराठी रयतेचा झेंडा आम्ही अटकेपार नेणार !

ओळख नसते पाळख नसते
ओळख नसते पाळख नसते, असे आपणास कोणीतरी भेटते.
मग एकमेकांची ओळख पटते, त्याची आपली गट्टी जमते.
एकमेकांच्या मनातील भाषा कळते इकडेतिकडे मन वळते.
इतकी मग पक्कड बसते सहज तोडणे आवघड असते.
दूर राहणे असह्य होते का असे हे नाते असते.
अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री" असते

आठवणींच्या पावसाने
आठवणींच्या पावसाने ,
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….
सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….
आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा....
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….
सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….
आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा....
प्रेमा पेक्षा श्रेष्ठ मैत्री,
अचानक पाऊस आल्यावर काही
थेंब तिच्या ओठांवर थांबले,
क्षणभर मी पाहतच राहिलो
पहिल्यांदाचं मला थेंब व्हावेसे वाटले..!!
प्रेमा पेक्षा श्रेष्ठ मैत्री,
म्हणून मी तीलाच जपली..
प्रेम माझ्या भाग्यात नाही..
पण मैत्रीने लाज राखली..
माझ्या ह्र्द्यातल्या झोपाळ्यावर..
घेऊ चल आपणही हिंदोळा..
झोके घेत घेत मग..
घेऊन जाऊ आपले प्रेम आभाळा..
खुभी नक्कीच होती ग माझ्यात तेव्हाच
तुझ्या हृदयात ठाण जे मांडू शकलो . . .
अन मला वाटत, न विसरू शकणारे असे
अविस्मरणीय क्षण नक्कीच देऊन बसलो . . .

जेव्हा तुला कोणी आवडतो..
जेव्हा तुला कोणी आवडतो..
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....

जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाही......

जवळ असताना मात्र ऐकमेकांशी पटत नाही....
कळतं सार पण वळत नाही......
खरचं काय असते मैत्री ते दुर गेल्याशिवाय कळत नाही...
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..
आनंद दाखवण्यासाठी हसायची गरज नसते..
दु : ख दाखवायला आसवांची गरज नसते..
न बोलता ज्यामध्ये सगळे समजते ती म्हणजे मैत्री........
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..
आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
हट्ट करुन बाबांकडे पुन्हा एकदा..
पाहीजे ते मागावेसे वाटतेय..
नको वाटणारया त्या शाळेत,
पुन्हा जावेसे वाटतेय..
मागच्या बाकावरच्या मित्रांना..
पुन्हा भेटावेसे वाटतेय..
आईने मारला धपाटा..
त्याचे मऊ मऊ व्रण..
बाबांच्या धाका मागे..
दडलेले ते प्रेम...
कधी येतील ते..
दिवस सुखाचे असे पुन्हा वाटतेय..
पुन्हा एकदा तरी..
लहान व्हावेसे वाटतेय..
आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
हट्ट करुन बाबांकडे पुन्हा एकदा..
पाहीजे ते मागावेसे वाटतेय..
नको वाटणारया त्या शाळेत,
पुन्हा जावेसे वाटतेय..
मागच्या बाकावरच्या मित्रांना..
पुन्हा भेटावेसे वाटतेय..
आईने मारला धपाटा..
त्याचे मऊ मऊ व्रण..
बाबांच्या धाका मागे..
दडलेले ते प्रेम...
कधी येतील ते..
दिवस सुखाचे असे पुन्हा वाटतेय..
पुन्हा एकदा तरी..
लहान व्हावेसे वाटतेय..
आठवणीनी मनात बागडावे
शब्दांचेच काळे ढग जमावे
सरी होऊन शब्दच बरसावे
तू वाचावे तुलाच मी लिहिलेले
मी समाधानाने चिंब भिजावे
आठवणीनी मनात बागडावे
स्पर्शाने तुझ्या कळ्यांनी फुलावे
ओल्या त्या पानातून वहीच्या
शब्दांनीच गंध होऊन दरवळावे
शब्द सारे फुलपाखरू होऊन उडावे
रंगास इंद्रधनू अपुले गुपित कळावे
ओळींवर आसवांची वीज पडावी
शब्दांनीच मग निशब्द होऊन रडावे
माझे शब्द सारे मग तुझेच व्हावे
मी शब्दा शब्दात कविता लिहावे
मी भावना कोरून ठेवाव्या पानात
तू त्यावर मुक्या शब्दांचे अभिप्राय द्यावे

मैत्री म्हणजे सुंदर पहाट मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.. फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ.. मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा अंगावर घ्यावा असा राघवशेला एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला... ऍकत रहावी अशी हरीची बासरी अस्मानीची असावी जशी एक परी... मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात नेहमीकरता असणारी तुझीचं साथ..... सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे... तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे
Friday, July 29, 2011
आम्हीतर बाबा Facebook वाले .....!
आम्हीतर बाबा Facebook वाले .....!
आम्हीतर बाबा Facebook वाले .....!
office मध्ये जायचं पहिलं internet on करून Facebook log in करायचं
......
hi gm , hw r u ? म्हणून chating ला सुरवात करायचं
Alt +Tab चा खेळ करून Boss ला चकवायाच
आणि हळूच Boss च्या PC मध्ये Facebook ला बघायचं
wallper ,personal Snap post करून दुस-र्यांना ओळख दाखवायची
आणि त्याचं ओळखी मधून Friend List वाढवायची
जर कुठल्या मुलीने दिली काही post त्यातच comment देऊन मन जिंकायची
जिंकल मन कि ओळख वाढवायची कधी येशील Online अशी Request करायची
काय आहे देश प्रेम ? काय आहे देशभक्ती ? म्हणून नवनवीन Group आणि Community
Joint करायचं
आणि त्यातच आम्ही आहोत राष्ट्रभक्त आहे हे सुचवायचं
आपले मित्र आणि आपले मैत्रीणीना Facebook Joint केलस का ? अस विचरायचं
आणि दुस-याचं मैत्रिणी बरोबर Chat करताना Search मारायला विसरून जायचं
आमचा तर धर्म पण मैत्री आणि जात सुद्धा मैत्री
या Facebook वरून आम्ही सुद्धा करणार जगाबरोबर मैत्री
आले किती ? गेले किती ? हे नाही आम्हाला माहिती
आमचे मित्र आमच्या मैत्रिणी आणि आपले Facebook हेच आम्हाला
माहिती...
हेच आम्हाला माहिती..............!
हेच आम्हाला माहिती............

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.
मुली एकमेकाला भेटतात
तेव्हा.
Hi,कशी आहेस?आज या ड्रेस मधे छान
दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला
...:बावळट आहे ती,मला अजिबात
नाही आवडत.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते,कमि ने फोन करने को टाइम
नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर
सोबतच्या मित्राला.. He is my Best
Friend!!!!
Moral:मुली तोंडावर गोड बोलतात पण
त्यांचे मन काळे असते..तर मुलगे
बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे
असता
तेव्हा.
Hi,कशी आहेस?आज या ड्रेस मधे छान
दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला
...:बावळट आहे ती,मला अजिबात
नाही आवडत.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते,कमि ने फोन करने को टाइम
नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर
सोबतच्या मित्राला.. He is my Best
Friend!!!!
Moral:मुली तोंडावर गोड बोलतात पण
त्यांचे मन काळे असते..तर मुलगे
बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे
असता
आपल्याला कोणी आवडणं
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
पण् जे चकाकतं ते प्रत्येक्
वेळीच् सोनं नसतं मन्
आपलं वेडं असतं वेडं
आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला
आपणच आवरायचं असतं...???????.
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
पण् जे चकाकतं ते प्रत्येक्
वेळीच् सोनं नसतं मन्
आपलं वेडं असतं वेडं
आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला
आपणच आवरायचं असतं...???????.
बेहिशोबी प्रेमाचं छत्र..!!
जंग जंग पछाडलं आजवर मी पण
कळलं नाही कधी आनंदाचं गमक,
तुझीचं प्रतीक्षा होती जणू जुळलं
आताशी माझ्या सुख-दुःखाचं यमक..!!
आयुष्याचं गणित सोडवायला सजणे
तुचं तर माझं तंतोतंत जुळणार सूत्र,
मुद्देसूद आणि सुटसुटीत जीवन केलंस
धरून तुझ्या बेहिशोबी प्रेमाचं छत्र..!!
कळलं नाही कधी आनंदाचं गमक,
तुझीचं प्रतीक्षा होती जणू जुळलं
आताशी माझ्या सुख-दुःखाचं यमक..!!
आयुष्याचं गणित सोडवायला सजणे
तुचं तर माझं तंतोतंत जुळणार सूत्र,
मुद्देसूद आणि सुटसुटीत जीवन केलंस
धरून तुझ्या बेहिशोबी प्रेमाचं छत्र..!!
मी असाचं आहे,
मी असाचं आहे,
एकटा एकटा जगणारा....
सर्वांत असाताना देखील,
स्वतःच्या शोधात फिरणारा..!!
मी असाचं आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा..!!
मी असाचं आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा..!!
मी असाचं आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसता हसता
नियतीला लाजवणारा..!!
मी असाचं आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतः मात्र,
काळोखात आटणारा..!!
मी असाचं आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन राहणारा..!!
एकटा एकटा जगणारा....
सर्वांत असाताना देखील,
स्वतःच्या शोधात फिरणारा..!!
मी असाचं आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा..!!
मी असाचं आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा..!!
मी असाचं आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसता हसता
नियतीला लाजवणारा..!!
मी असाचं आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतः मात्र,
काळोखात आटणारा..!!
मी असाचं आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन राहणारा..!!
Thursday, July 28, 2011
आमोल
आ- आवडता नेता
मो- मोल ज्याचे सर्वांसाठी
ल - लळा लावतो सर्वांला
असा हा आमोल
मो- मोल ज्याचे सर्वांसाठी
ल - लळा लावतो सर्वांला
असा हा आमोल
मी असाचं आहे, खुप प्रेमाने बोलणारा..
मी असाचं आहे,
एकटा एकटा जगणारा....
सर्वांत असाताना देखील,
स्वतःच्या शोधात फिरणारा..!!
मी असाचं आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा..!!
मी असाचं आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा..!!
मी असाचं आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसता हसता
नियतीला लाजवणारा..!!
मी असाचं आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतः मात्र,
काळोखात आटणारा..!!
मी असाचं आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन राहणारा..!!
एकटा एकटा जगणारा....
सर्वांत असाताना देखील,
स्वतःच्या शोधात फिरणारा..!!
मी असाचं आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा..!!
मी असाचं आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा..!!
मी असाचं आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसता हसता
नियतीला लाजवणारा..!!
मी असाचं आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतः मात्र,
काळोखात आटणारा..!!
मी असाचं आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन राहणारा..!!
मेघ दाट दाटूनी आले
हे मेघ दाट दाटूनी आले
अन तसेच दाटूनी थकले,
बरसण्यास नव्हते कारण
तसे वारेही नव्हते सुटले.
कोरडी सौदामीनी कडाडली,
ती आली तशीच निघून गेली.
प्रश्नच पडला हा नभाला कि,
वेळ बरसण्याची का निघून गेली?
काही केल्या प्रश्न सुटेना,
कुठेच काही पर्याय दिसेना.
भरून येता जड झालेल्या..
तव घनांना दिशाच गवसेना.
आपुल्या हातून काही घडले,
वा नेमके कुठे काय चुकले?
आपल्या पावसालाच कि काय,
दुज्या कुठल्या पावसाने लुटले..!!
अन तसेच दाटूनी थकले,
बरसण्यास नव्हते कारण
तसे वारेही नव्हते सुटले.
कोरडी सौदामीनी कडाडली,
ती आली तशीच निघून गेली.
प्रश्नच पडला हा नभाला कि,
वेळ बरसण्याची का निघून गेली?
काही केल्या प्रश्न सुटेना,
कुठेच काही पर्याय दिसेना.
भरून येता जड झालेल्या..
तव घनांना दिशाच गवसेना.
आपुल्या हातून काही घडले,
वा नेमके कुठे काय चुकले?
आपल्या पावसालाच कि काय,
दुज्या कुठल्या पावसाने लुटले..!!
मिळालेलं सगळ काही..
मिळालेलं सगळ काही.. काहीही,
सांभाळून ठेवायची तुझी जुनी सवय
अगदी आपली जुनी बिलं सुद्धा..,
म्हणूनच तर सग़ळं तुझ्याकडेच दिल होतं.
तश्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत आणि
तुही बदलणार्यातली नव्हतीस तशी.
आणि अचानक मी कशाला तरी तुला 'नाही' म्हटल्यावर,
तु जुन्या सगळ्याच संदर्भांचा हिशेब काढलास..
जे मीच तुझ्याकडे दिले होते.. फक्त जपून ठेवशील म्हणून.
नंतर कळल कि ती बिलं सुद्धा फक्त तु दिलेली होती..
अन हिशेब लागावा म्हणून जपली होतीस.
शेवटी म्हणालीस, "मला उपयोग असल्याशिवाय
मी काहीच सांभाळून ठेवत नाही."

पून्हा एकदा आरोप प्रत्यारोप
पून्हा एकदा
आरोप प्रत्यारोप
रोख नेमका पण
प्रश्नच प्रश्न.. सैरभैर
तू हवासच.. गुन्हेगार लागतोच केस चालवताना
तूच नकोस.. सग्गळं तुझ्यामुळेच झालं
प्रचंड रोष अगदी जळजळणारा
अव्यक्त आकांत.. कानाठाळ्या बसवणारा...
..कित्ती काही मावतं नाही दोन डोळ्यात.. पूढे मात्र
थरथरत्या बंद ओठांवर एक ओघळ... अन.. गून्हा कबूल... पून्हा एकदा!!

एकांत जणू बोलका झाला
आत पाय ठेवतो न ठेवतो
तोच एकदम गलका झाला
जणू मी नजीक गेल्याक्षणी
एकांत जणू बोलका झाला
फेरच धरला भोवती अन
सगळीकडेच शब्दच शब्द
अर्थाविणा राहिले ते ज्यांचे
अस्तित्व अपूर्ण अब्द अब्द
ओलांडता तो सावळागोंधळ
स्थिरावले थोडेसे सर्वकाही
तिथे पुढे जे दिसले, कळले
तेच अश्यात पाहिलेच नाही
किती काही निसटून जाते
मनात डोकावले नाही तर
हट्टाने आपण उन्हात ईथे
अन तिथे पडून जाते सर
पक्के ठरवूनही ऐन वेळीच
किती अतर्क्य वागतो ना
आपण कधीतरी स्वतःलाच
किती अनोळखी वाटतो ना!!
तोच एकदम गलका झाला
जणू मी नजीक गेल्याक्षणी
एकांत जणू बोलका झाला
फेरच धरला भोवती अन
सगळीकडेच शब्दच शब्द
अर्थाविणा राहिले ते ज्यांचे
अस्तित्व अपूर्ण अब्द अब्द
ओलांडता तो सावळागोंधळ
स्थिरावले थोडेसे सर्वकाही
तिथे पुढे जे दिसले, कळले
तेच अश्यात पाहिलेच नाही
किती काही निसटून जाते
मनात डोकावले नाही तर
हट्टाने आपण उन्हात ईथे
अन तिथे पडून जाते सर
पक्के ठरवूनही ऐन वेळीच
किती अतर्क्य वागतो ना
आपण कधीतरी स्वतःलाच
किती अनोळखी वाटतो ना!!
किती वाट पाहशील श्रीरंगाची
सांग ना राधे तू रूसलीस का
मुख फिरवून गं बसलीस का
आभास झाला का मोहनाचा
चुकला का ठोका काळजाचा
तूझ्याच हाकेला ओ देईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
किती वाट पाहशील श्रीरंगाची
किती ओढ लागली नभरंगाची
तो जाहला असे कोठेसे दंग
सर्वास प्रिय असे त्याचा संग
तरी तयाची सानिका तूच गं
साद देवूनी पहा तो येईल गं
असेल खट्याळ हसू तव नयनी
बघेल जरी तो जाई मन मोहुनी
मनी कृष्णी नाव तुझेच राधे
झुरे ते तर तुझ्यासाठीच राधे
येई तो जवळ तूला घेईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
मुख फिरवून गं बसलीस का
आभास झाला का मोहनाचा
चुकला का ठोका काळजाचा
तूझ्याच हाकेला ओ देईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
किती वाट पाहशील श्रीरंगाची
किती ओढ लागली नभरंगाची
तो जाहला असे कोठेसे दंग
सर्वास प्रिय असे त्याचा संग
तरी तयाची सानिका तूच गं
साद देवूनी पहा तो येईल गं
असेल खट्याळ हसू तव नयनी
बघेल जरी तो जाई मन मोहुनी
मनी कृष्णी नाव तुझेच राधे
झुरे ते तर तुझ्यासाठीच राधे
येई तो जवळ तूला घेईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
सखे
तूझ्याच सारखे नटते, थटते
अन नभी चांदणे ते लखखते
परि वेड्यास कसे कळत नाही
त्यास तुझी सर कधी येत नाही
ह्या प्राजक्तानेही तसेच करावे
वेळी अवेळी असे गंधाळून जावे
त्यालाही न कसे एवढे उमजावे
तूज श्वासगंधाने तो भारून जाये
कधी अबोलीही असेच वागते
नाजूकतेला ती ही दाद मागते
पण ती तर नेहमी हेच सांगते
तूज स्पर्शाचे तिज अप्रूप वाटते
सृष्टीसुद्धा वेडावते सहवासात तूझ्या
मग मी तरी स्वतःस सावरणार कसे
सखे गंधाळून स्पर्शतेस मनास माझ्या
मी स्वतःस कुठवर व आवरणार कसे
अन नभी चांदणे ते लखखते
परि वेड्यास कसे कळत नाही
त्यास तुझी सर कधी येत नाही
ह्या प्राजक्तानेही तसेच करावे
वेळी अवेळी असे गंधाळून जावे
त्यालाही न कसे एवढे उमजावे
तूज श्वासगंधाने तो भारून जाये
कधी अबोलीही असेच वागते
नाजूकतेला ती ही दाद मागते
पण ती तर नेहमी हेच सांगते
तूज स्पर्शाचे तिज अप्रूप वाटते
सृष्टीसुद्धा वेडावते सहवासात तूझ्या
मग मी तरी स्वतःस सावरणार कसे
सखे गंधाळून स्पर्शतेस मनास माझ्या
मी स्वतःस कुठवर व आवरणार कसे
प्रेमात पडू शकतो कोणीही.
प्रेम... प्रेम ही नुसती संकल्पना नव्हे तर तेच जीवन आहे अर्थात ज्याने त्याच्या विशुद्ध स्वरूपाचा अनुभव घेतला ती कोणतीही व्यक्ती होकारवजा मान हलवून हे मान्य करून टाकेल. अता प्रेम म्हणजे काय हे असले प्रश्न मनात येणं सहाजिक आहे पण एक लक्षात ठेवून चाललं पाहिजे की जिथे बुद्धी हात टेकते तिथून तर प्रेम अनुभवण्याला सुरूवात होते. ते असं शब्दात वगैरे सांगणं म्हणजे तहान लागणे म्हणजे काय होतं हे अशास्त्रीय भाषेत समजावण्याइतकच अवघड आहे. हा तर फक्त अनुभूतीचा भाग! एखाद्या स्वप्नाच्या, ध्येयाच्या किंवा अगदी कश्याच्याही प्रेमात पडू शकतो कोणीही. आपापल्या भावविश्वावर अवलंबून आहे की कोणाला काय भिडतं. एक अनुभव मात्र नक्की नक्की येतो प्रेमात अन तो म्हणजे 'जगावेगळं काहीतरी गमवल्याशिवाय जगावेगळं काहीतरी मिळत नाही!'
हीच होती ती माझी अनपेक्षित भेट
जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
भेट होती नेरुल स्टेशनला ठरलेली
कोण पोहोचेल अगोदर त्यासाठी शर्यत चाललेली
मी होतो पनवेल स्टेशनावर
पकडायची होती ११.४२ ची सि एस टी
मेगा ब्लोक असल्यामुळे झाली ती रद्द
पण मी मात्र होतो भेटीसाठी पूर्णपणे सज्ज
१२.०५ ची सि एस टी पकडून पोहोचलो मी ४ नंबर फलाटावर
ती माझ्या आधीच पोहोचलेली होती दोन नंबरवर
तिने हाय केले न हेल्लो अस वाटलाच नाही कि आहे पहिली भेट
म्हणाली मला लगेच पोहोचायचं आहे घरी थेट
तिला थांबवण्यासाठी काही वेळ सोबत घालवण्यासाठी मी केला प्रयत्न खूप
ब्यागेतील सामान दाखवून , चोकलेट देवून , नको नको ते करून थांबवू पहिले खूप
१२.३५ ची ठाणे लागली होती घाई घाईत गेली तिच्यात बसून
हीच होती ती माझी अनपेक्षित भेट जिचे होते घारे डोळे

आमोल घायाळ

Wednesday, July 27, 2011
काय तरी मिळत प्रेमात
काय तरी मिळत प्रेमात पडून दुख वेदना आणि पश्चातापाचा आहेर,
तरुण मन म्हणे हेच दिवस आहेत कधीतरी पडा रे यातून बाहेर..!!
उबग येत नाही का रे तुम्हाला तेच तेच नखरे नि हट्ट झेलण,
जीव ओवाळून टाकण आणि खोट वाटावं इतक गोड बोलण..!!
सरळ सरळ प्रक्टिकल वागावं का भाव द्यावा फुकटचा मनाला,
त्याला अक्कल नसते तेच तर भाग पाडत प्रेमात पडायला..!!
खूपचं उत्तम जर जमलं ठेवायला रंगात रंगुंनी रंग आपला वेगळा,
मला तर वाटत सुखी होण्यासाठी बिनधास्त वापरावा हाच फॉर्म्युला..!!
आधार मिळतो म्हणे जीवाला भावनिक संकटांच्या वेळी सावरायला,
लहान का असता तुम्ही येत नाही का स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरायला..!!
खरंच असत का प्रेम मैलाचा दगड आणि टिकणार शाश्वत चिरकाल,
गेलेत ते दिवस कायमसाठी राहिल्यात त्या फक्त आठवणी आजकाल..!!
एकचं तर जीव असतो आपल्याकडे का तो कुणाला लावून फसायचं,
घरचंच का कमी असतं त्यात दुसऱ्याचं घोड फुकटच पोसायचं..!!
धन्यवाद देतो बाप्पाला त्याने ठेवलंय मला "पुन्हा" प्रेमात पडण्यापासून दूर,
पण बघून दोन चिमण्या जीवांना आजही मनात का बर उठतो काहूर..!!

Monday, July 25, 2011
प्रेम म्हणजे दोन जीवांचे.. एक छोटेसे अस्तित्व...
काही ओझी हि...
पापण्यांवरच सावरतात...
त्याच अदृश्य ओझ्यांना..
स्वप्न म्हणतात..
माझा तुझ्या सोबतचा,
प्रत्येक क्षण वेगळा आहे..
आता तू दूर असलीस तरी..
हृदयात पसारा सगळा आहे..
किती वेळा सांगू,
आता तुला विसरायचे आहे..
मनात खूप ठरवतो पण..
हृदय म्हणते थांब अजून थोड आठवायचे आहे.
प्रेम म्हणजे दोन जीवांचे..
एक छोटेसे अस्तित्व...
पण लोक म्हणतात ते तर आहे..
मृगजळ-एक नसलेले अस्तित्व..
प्रेमाचा पाउस घेहून
येतो नवीनच जोश,
मग त्या बरसाती मध्ये
राहीनच कसा होश...!!
पापण्यांवरच सावरतात...
त्याच अदृश्य ओझ्यांना..
स्वप्न म्हणतात..
माझा तुझ्या सोबतचा,
प्रत्येक क्षण वेगळा आहे..
आता तू दूर असलीस तरी..
हृदयात पसारा सगळा आहे..
किती वेळा सांगू,
आता तुला विसरायचे आहे..
मनात खूप ठरवतो पण..
हृदय म्हणते थांब अजून थोड आठवायचे आहे.
प्रेम म्हणजे दोन जीवांचे..
एक छोटेसे अस्तित्व...
पण लोक म्हणतात ते तर आहे..
मृगजळ-एक नसलेले अस्तित्व..
प्रेमाचा पाउस घेहून
येतो नवीनच जोश,
मग त्या बरसाती मध्ये
राहीनच कसा होश...!!
माळीन तुझ्या केसात... चंद्र ताऱ्यांचा गजरा ..
आज तुझ्या आवाजातून..
ते मर्म हरवले होते..
आज तू बोलताना..
तुझ्या शब्द मागे काही लपले होते..
असतात काही नाती..
सूर्यासारखी प्रखर..
वेळ पडल्यास..
चंद्रासारखी स्वच्छ आणि नितळ..
पिरीम पिरीम कसलं आलया
समदच खोत हाय
आर, खरयाला हिथ किंमत न्हाय
ते तर मागावरच धोट हाय..
तू निघून गेलीस,
अन पावसाने चिंब भिजवले..
तुझ्या विरहात येणारे अश्रू..
त्याच्या थेंबात वाहून नेले..
स्वप्नांची परी हरवली आहे..
निजेने पाठ फिरवली आहे..
मिटले डोळे तरी मन जागेच राहत आहे..
वेडी आहे हि रात्र अजूनही स्वप्नांच्या मागे धावत आहे..
उजवी डावी करत आजवर घडलं
नुसतंच विचारांचं राजकीय घर्षण,
बडा घर पोकळ वासा
मराठ्यांना आरक्षणाचं आभासी आकर्षण!!
सत्तेची दोरी हाती तरी
माकड खेळवले नाही,
दिव्याखाली अंधार ठेऊन
स्वप्न बोळवले नाही..!!
माळीन तुझ्या केसात...
चंद्र ताऱ्यांचा गजरा ..
खुलून येईल मग...
तुझा चेहरा हसरा..

Sunday, July 24, 2011
असतात काही नाती..
बोकडाच्या हातात हात घालून,
कोंबडा लागला नाचू...
श्रावण सुरु झाला आता..
एक महिना तरी वाचू...
पावसाने आज सख्या सगळ्यांना भिजवलं
आणि मला मात्र त्याने कोरडच ठेवल !
का म्हणून विचारता, त्याने तुझ कारण सांगितल
तुझ्याशिवाय बघ मला त्याने सुद्धा नाकारलं !!!!!!!!!!
श्रावण म्हणजे मला वाटते,
प्राजक्ताचे दिवस .
सृष्टीने कधीतरी करून
फेडलेला नवस...
संध्याकाळ झाल्यावर...
पक्षी घरट्यात परततात...
सूर्य अस्ताला गेला कि..
तुझ्या आठवणी मनात दाटतात..
म्हटले होते तुला एकदा...
मालायचाय केसात तुझ्या गजरा..
फक्त त्या शब्द स्पर्शाने...
खुलला होता तुझा चेहरा..
तुझेही पाय मातिचेच असतिल
याची जाणिव आधिच होती
म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !
आता तुझ्या आठवणींनी ,
फार कहर केला आहे...
तुला विसरायचे म्हटले तर तुझ्यासोबतच प्रत्येक क्षण,
पुन्हा डोळ्यासमोर हजर केला आहे..
पावसाच्या प्रत्येक थेंबात ,
धरतीने नवीन गाणे गायलेलं.
झाडांमध्ये पुन्हा नव्याने...
जगायची उम्मेद जगलीय..
आज तुझ्या स्पर्शाने ...
अंग अंग मोहरून गेले...
ढग दाटले नसतानाही...
अंग चिंब भिजून गेले.
पाठीवरचा तीळ तुझ्या ..
नजर रोखून घेत होता...
तुझ्या जवळ येण्या करिता...
माझ्या शरीराला ओढत होता..
आज स्वप्नांनी...
मनात काहूर केला होता..
तू दूर असलीस तरी...
तुझा आभास जवळ होता..
कधी एकांतात बसलो कि...
तुझ्या आठवणी स्पर्धा करतात..
तुला आठवायचे म्हटले कि..
दूर दूर पळतात..
आठवतेय तुला मी तुला,
एकदा दुरून पहिले होते..
तुला आवाज द्यायचं फक्त..
माझ्या मनातच राहिलं होते.. :
असतात काही नाती..
विश्वासावर टिकलेली..
विश्वासाच्या गळा घोटतात..
माणस माणसातून उठलेली...

Monday, July 18, 2011
जुनेच sms
जुनेच sms पुन्हा वाचत असतात कोणीतरी
पावसाच्या थेंबात अश्रू लपवून रडत असतात कोणीतरी
कोणाला तरी हसताना लपून बघत असतात कोणीतरी
दिवे सगळे विजल्यवर का जळत असतात कोणीतरी
अमोल घायाळ

भेट sms
आयुष्यात कुटली भेट शेवटची ठरेल सांगता एत नाही
म्हणूनच घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घेवा कि
त्या आठवणीने चेहर्या वरफक्त हसू उमटेल

प्रेम कोणावर करायचं ? sms
प्रेम कोणावर करायचं ?
१ जो आपल्याला आवडतो त्याच्यावर कि;ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
२ मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर कि ;त्याला जपणाऱ्या काट्यावर
३ परवा भेटलेल्या मैत्रीवर कि;जीव ओवाळून टाकणाऱ्या आई वडिलांवर
अमोल घायाळ
जीवन आहे एक रम्य पहाट ,
संकटांनी गजबजलेली वादळवाट.
प्रेमाच्या पाझ्रांची वाहती एक सरिता
नात्याच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता
जाणीवेच्या पलीकडलेले जगावेगळ गाव
यालाच तर आहे
''आयुष्य'' हे नाव

माझा प्रत्येक शब्द
आज पावसाने पुन्हा...
मुसळधार बरसायचे ठरवले आहे ...
मी तुझ्या आठवणींना पुन्हा..
नव्याने जगायचे ठरवले आहे...
नात्यानुसार प्रेम करायला,
प्रत्येकजण शिकवतात,
मनाने जडलेल्या नात्याला,
का मग ते दुखवतात..
माझा प्रत्येक शब्द,
तुझ्या शिवाय कुठे रूळलाच नाही..
मी प्रत्येक शब्द तुझ्यासाठी लिहिला..
पण तो शब्दातील तो भाव तुला कळलाच नाही..
तुझ्या वरील प्रेम व्यक्त करताना,
कुठे तरी कमी पडलो,
नाहीतर मी पुन्हा असा...
एकाकी नसतो पडलो...
आता माझ्या शब्दांनीच,
ठरवले माझा घ्यायचा निरोप...
मी तुला दुखावल्याचा..
आहे त्यांचा आरोप...
मुसळधार बरसायचे ठरवले आहे ...
मी तुझ्या आठवणींना पुन्हा..
नव्याने जगायचे ठरवले आहे...
नात्यानुसार प्रेम करायला,
प्रत्येकजण शिकवतात,
मनाने जडलेल्या नात्याला,
का मग ते दुखवतात..
माझा प्रत्येक शब्द,
तुझ्या शिवाय कुठे रूळलाच नाही..
मी प्रत्येक शब्द तुझ्यासाठी लिहिला..
पण तो शब्दातील तो भाव तुला कळलाच नाही..
तुझ्या वरील प्रेम व्यक्त करताना,
कुठे तरी कमी पडलो,
नाहीतर मी पुन्हा असा...
एकाकी नसतो पडलो...
आता माझ्या शब्दांनीच,
ठरवले माझा घ्यायचा निरोप...
मी तुला दुखावल्याचा..
आहे त्यांचा आरोप...
बॉम्ब फुटतोय पुन्हा पुन्हा......
नका उडवू झोप आमची, काय केला आम्ही गुन्हा
धर्मं जातीचे नाव घेउनी, बॉम्ब फोडतात पुन्हा पुन्हा.....
मास बिघरते रक्त सांडते, मरतात इथे निष्पाप जीव
आई वडीलान पासून मूल छिनते, पाहून येते त्यास कीव
डोळ्यांमधून अश्रु वाहता, दुखाने होतो व्याकुळ जीव
नेता येते पाहून जातो, जाहिर करतो पैसे पुन्हा.....
असो हिंदू असो मुसलमान, या धर्तीचे लेकरे आपण
धर्मं जातीचे नाव घेउनी, नेता साधतो आपली साधन
निष्पाप जनता आगीत लपटते, नेत्यास मिळते त्याचे आसन
नका लढू रे आपआपसात, आपल्याच हातून घडतोय गुन्हा.....
आई मरते बाप मरतो, पोरके होते मूल तान्हे
घर बनते स्मशान घाट, बिखरतात आयुष्याची सर्व पाने
या आगीत मरतात सारे, मरतात इथे हिंदू मुसलमाने
दहशतवाद्यास ठेचुन काढा, देऊ नका त्यास पन्हा.....
हवा बुद्ध हवा येशु, नको आम्हास रक्त पिशासु
शांत प्रिय देशास माझ्या, डोळ्यात येते रक्ताचे आसू
निरागस जनतेच्या चिंधड्या उड़ताच, दहशतवाद्यास येते हसू
असा हां भयानक राक्षस, बॉम्ब फोडतो पुन्हा पुन्हा.....

terorist म्हणजे कोण ?
शिक्षक : terorist म्हणजे कोण ?
विद्यार्थी : ते tourist आहेत...
जे आपल्या बाहेरील देशातून आपल्या देशात दिवाळी साजरी करण्याकरिता येतात...

Thursday, July 14, 2011
बाळासाहेब, शिवसेना आणि महाराष्ट्र!
बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याचे फटके गेल्या पन्नास-साठ वर्षांत अनेकांना खावे लागले. पंडित नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत आणि स. का. पाटलांपासून जॉर्ज फर्नांडिसांपर्यंत अनेकांची राजकीय व्यंगे बाळासाहेबांनी आपल्या ' मार्मिक ' शैलीतील कुंचल्यातून मराठी माणसापर्यंत पोहोचवली. पण बाळासाहेबांनी कधी स्वत:चे व्यंगचित्र काढल्याचे ऐकिवात नाही. ते त्यांनी काढलं असतं , तर नेमकं कसं काढलं असतं , याची आता केवळ कल्पनाच करता येते. कारण गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून वयोमानानुसार त्यांनी व्यंगचित्र काढणं थांबवलं आहे. त्यांच्या स्वत:च्याच शब्दांत सांगायचं , तर ' ज्या हातांनी अनेकांना थरथरायला लावलं , तेच हात आता थरथरायला लागले आहेत! '
बाळासाहेबांचं हे वाक्य त्यांची सर्व स्वभाववैशिष्टयं आपल्यापुढे उभी करतात. स्वत:विषयीचा कमालीचा अभिमान आणि शिवाय अत्यंत बोचरा पण मार्मिक विनोद ही त्यांची अंगभूत वैशिष्टयं आहेत. ती तर यातून दिसतातच ; शिवाय स्वत:च्या ढासळत्या प्रकृतीचेही दर्शनही घडवतात. तरीही व्यंगचित्रकार बाळासाहेब यांच्या कुंचल्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे उभे राहिले असते , हा प्रश्न शिल्लक उरतोच.
Balasaheb, Raj and Uddhav Thackeray
बाळासाहेबांनी १९६०च्या दशकात शिवसेना स्थापन केली , तेव्हा ते बंद गळयाचा कोट घालून मस्त पाईप वगैरे ओढायचे. त्यानंतर ते झब्बे वगैरे घालू लागले आणि भारतीय जनता पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेण्याच्या वेळी त्यांनी हिंदुत्वाची भगवी शाल अंगावर घेतली होती. ती शाल अद्यापही कायम आहे. यापैकी स्वत:चे नेमके कोणते रूप त्यांनी व्यंगासाठी निवडले असते , हे सांगता येणं कठीण आहे. कारण बाळासाहेबांनी केवळ स्वत:ची वेशभूषाच आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या या राजकीय प्रवासात बदलली , असे नव्हे तर एकीकडे मराठी माणसाच्या मनातील अंगार याच चार दशकांत सतत फुलवत ठेवतानाच , त्यांनी आपल्या राजकीय भूमिका वेळोवेळी बदलल्या आणि देशातील बहुतेक सर्व पक्षांशी सोयीनुसार आघाडया केल्या. पण ते सर्व करत असताना , बाळासाहेब हेच आपले तारणहार आहेत , अशी त्यांची प्रतिमा मराठी माणसाच्या मनात कायम राहिली. त्यांचे हे यश फार मोठे आहे.
अर्थात , मराठी माणसाचा तारणहार ही बाळासाहेबांची आयुष्याच्या उत्तरार्धात प्रतिमा झाली असली , तरी त्यांना मराठी माणसांचे प्रश्न हातात घेऊन १९६०च्या दशकात किमान एक संघटना स्थापन करावीशी वाटली , त्याचे मूळ कारणच महत्त्वाचे होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने १९५०च्या दशकात उग्र आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनात १०५ हुतात्मेही झाले होते. अखेरीस ' संयुक्त महाराष्ट्रा ' चा मंगलकलश मराठी माणसाच्या हातात आला आणि १ मे १९६० रोजी या मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याची स्थापनाही झाली. तेव्हा आता मराठी भाषिकांच्या या राज्यात मराठी माणसाला सुगीचे दिवस येतील , अशी स्वप्नं सारेच पाहत होते. प्रत्यक्षात मराठी माणसाला मुंबईतच अवमानकारक वागणूक मिळत होती. नोकरीपेशात अ-मराठी लोकांचं वर्चस्व होतं. मालकवर्ग हा बव्हंशी अ-मराठीच होता. रंगवलेल्या स्वप्नापेक्षा सामोरं आलेलं वास्तव हे अगदीच वेगळं होतं. मराठी माणसाच्या भावना पुरत्या कोमेजून गेल्या होत्या.
' मार्मिक ' नावाच्या मराठीतल्या पहिल्यावाहिल्या व्यंगचित्रसाप्ताहिकाची स्थापना बाळासाहेबांनी नेमक्या त्याच काळात केली होती. त्या साप्ताहिकातून बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या त्याच कोमेजलेल्या भावनांना खतपाणी घालण्याचं काम सुरू केलं आणि बघता बघता बाळासाहेबांच्या पाठीशी लाखोंच्या संख्येनं मुंबईतला मराठी माणूस उभा राहू लागला.
हे चित्र जसं गेली चार-साडेचार दशकं कायम आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या स्थापनेनंतर बरोब्बर चार दशकांनी मराठी माणसाचाच विषय घेऊन आणि हुबेहूब बाळासाहेबांचीच भाषा आणि मुद्दे घेऊन राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ' महाराष्ट्र नवनिर्माण सेने ' लाही गेली तीन वर्षे मिळत असलेला प्रतिसाद कायम आहे. त्यामुळेच शिवसेनेनं मराठी माणसासाठी काय केलं , असा प्रश्न कायम राहतो. चार दशकांच्या वाटचालीत मुंबई महापालिकेत दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर महाराष्ट्रावरही राज्य करण्याची संधी याच मराठी माणसानं एकदा म्हणजे १९९५ मध्ये शिवसेनेला दिली होती. त्या काळात मराठी माणसांचे , निदान मुंबईतल्या मराठी माणसांचे किमान काही महत्त्वाचे प्रश्न शिवसेनेला सहज सोडवता आले असते आणि तसे झाले असते , तर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांना अन्य काही विषय घ्यावे लागले असते. पण तसं झालं नाही आणि त्यामुळेच शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर तसेच कामावरही नेमका प्रकाश पडतो.
मग याचा अर्थ शिवसेनेनं आपल्या चार दशकांच्या प्रवासात काहीच केलं नाही , असा घ्यायचा का ?
शिवसेना स्थापन झाली , तेव्हा मुंबई महापालिकेत काँग्रेसची निरंकुश म्हणता येईल , अशी सत्ता होती. विरोधी पक्ष अगदीच दुबळे वा कमकुवत झालेले होते. त्यामुळे स्थापनेनंतर दोनच वर्षांत बाळासाहेबांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवायचं ठरवलं , तेव्हा राष्ट्रीय पातळीवरील प्रजा समाजवादी पक्षानं त्यांच्याशी हातमिळवणी करायचं ठरवलं. ही आघाडी शिवसेनेच्या चांगलीच फायद्याची ठरली आणि तेव्हाच्या म्हणजे १९६८च्या मुंबई महापालिकेतील १२१ सदस्यांमध्ये शिवसेनेचे थोडेथोडके नव्हे तर चांगले ४२ सदस्य निवडून आले होते. काँग्रेसच्या नगरसेवकांवर जरब निर्माण करता येईल , एवढी ताकद मुंबईकरांनी शिवसेनेला दिली होती. त्या जोरावर मुंबईकरांचे नागरी प्रश्न सोडवण्यात शिवसेनेनं जोरदार पुढाकार घेतला. त्याच काळात मुंबईत शिवसेनेचं ' नेटवर्क ' उभारण्याचं कामही जोमानं सुरू झालं होतं. मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डामागे एक या पध्दतीनं शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. ज्या वॉर्डातून नगरसेवक निवडून आले होते , तेथे ते आणि शाखाप्रमुख हातात हात घालून निदान सुरुवातीच्या काळात तरी काम करत आणि जिथे नगरसेवक नव्हते तिथे शाखाप्रमुखांनाच नगरसेवकाची भूमिका बजवावी लागे. ही भूमिका प्रामुख्याने पाणी न येणे , गटारी तुंबणे , कचरा उचलला न जाणे अशा प्रश्नांची तड लावण्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका असे. महापालिका कार्यालयांत जाण्याऐवजी शिवसेनेच्या शाखांवर गेल्यास प्रश्न अधिक लवकर सुटू शकतात , अशी भावना तेव्हा मुंबईतील मराठी माणसाच्या मनात निर्माण होऊन गेली आणि पुढे बराच काळ ती कायमही राहिली. पुढे म्हणजे १९७०च्या दशकाच्या प्रारंभी मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली , तेव्हा डंकन रोडवरच्या कांदा-बटाटा गोदामांवर मोर्चे वगैरे नेण्यात आले आणि नंतर ' शिवसेना पुरस्कृत ' असे फलक लावून अनेक जीवनावश्यक वस्तू रास्त दराने उपलब्धही करून देण्यात आल्या. ही परंपरा पुढे प्रदीर्घ काळ सुरू होती. १९९०च्या दशकाच्या प्रारंभी खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली , तेव्हा मुलुंडमध्ये शिशीर शिंदे यांनी धारा तेलाची गोदामे व्यापा-यांना उघडायला लावून रास्त दराने तेल जनतेला उपलब्ध करून दिले , हे लक्षात घ्यायला हवे. त्याचवेळी शिवसेनेचे फलक लावून वडा-पावच्या गाडयाही रस्तोरस्ती उभ्या ठाकल्या होत्या!
पण खरा प्रश्न हा नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांना डावलले जाते , हा होता. अर्थात , व्यावसायिक म्हणजे ज्यास प्रोफेशनल म्हणता येईल अशा प्रकारच्या प्रशिक्षणात मराठी माणूस कमी पडत होता , हीदेखील वस्तुस्थिती होती. या प्रश्नांची तड लावणे महत्त्वाचे आहे , हे बाळासाहेबांच्या लक्षातही आले होते. त्यातूनच ' स्थानीय लोकाधिकार समिती ' ची स्थापना करण्यात आली आणि सूत्रे सुधीर जोशी यांच्या हाती सोपवण्यात आली. या समितीने प्रारंभीच्या काळात मुंबईतील एअर इंडिया आणि मोठया राष्ट्रीकृत बँकांसारख्या बडया आस्थापनात मराठी माणसांवर होणा-या अन्यायाची तड लावण्याचा प्रश् हातात घेतला. त्यातूनच पुढे या आस्थापनात होणा-या नोकरभरतीसाठी मराठी माणसांच्या प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले. मराठी चेहरा मुंबईतील बडया आस्थापनांत दिसू लागला , त्यास या समितीचं काम निश्चितच कारणीभूत होतं.
पण त्याचवेळी बाळासाहेबांचं राजकारण मराठी माणसाला बहुधा पटत नसावं. अन्यथा आणीबाणीला म्हणजेच पर्यायानं इंदिरा गांधी यांना पाठिंबा देण्याचा शिवसेनेचा निर्णय हा मराठी माणसाला पटला नसल्याचंच त्यानंतरच्या म्हणजे १९७८मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालांवरून दिसून आले होते. त्यानंतर बाळासाहेब प्रदीर्घ काळ अस्वस्थ होते. निकालानंतर शिवाजीपार्कवर झालेल्या सभेत तर त्यांनी शिवसेना सोडण्याचीच भाषा केली होती. तेव्हा ते पूर्णपणे काँग्रेसमय झाले होते. १९८०च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी काँग्रेसचा प्रचारही केला.
पण पुढे १९८५च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला दणदणीत यश मिळालं आणि सारंच चित्र पालटलं. त्याच सुमारास देशात रामजन्मभूमीमुक्ती आंदोलन संघपरिवारानं उभं केलं होतं. बाळासाहेबांनी दूरदृष्टीने त्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि १९८७मध्ये विलेपार्ल्यात झालेली विधानसभेची एक पोटनिवडणूक ' गर्वसे कहो हम हिंदू है! ' या घोषणेच्या जोरावर जिंकली. त्यानंतरच भारतीय जनता पक्षाला शिवसेनेबरोबर ' युती ' करणं भाग पडलं. खरं तर शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रितपणे १९८४मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगोलग झालेल्या लोकसभा निवडणुका लढवल्याही होत्या. पण पुढच्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मात्र भाजपने शरद पवार यांनी तेव्हा काँग्रेसच्या विरोधात उभ्या केलेल्या ' पुरोगामी लोकशाही दला ' चा एक घटकपक्ष म्हणून लढवल्या होत्या आणि बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्या शैलीत ' कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या! ' अशी उपहासात्मक टिपणीही केली होती , हे इथे आवर्जून सांगायला हवं.
मात्र , हिंदुत्वाचा हा झेंडा खांद्यावर घेतल्यावर शिवसेनेने मोठीच मजल मारली. त्याच सुमारास म्हणजे १९८६मध्ये पवार पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या त्या निर्णयाला वैतागून मराठवाडयातील तरुणवर्गानं मोठया संख्येने शिवसेनेची पाठराखण सुरू केली होती. विदर्भातही विविध कारणांनी शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत होता. पुढे १९९२मध्ये अयोध्येत ' बाबरीकांड ' घडलं आणि तीनच महिन्यांत १९९३ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाले आणि या सा-यांची परिणती १९९५मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप ' युती ' चं सरकार येण्यात झाली. ' एकच लक्ष विधानभवन! ' अशी घोषणा ठाकरे यांनी १९९० मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळीच दिली होती. त्यास फळ आलं होतं. दरम्यान १९९१मध्ये छगन भुजबळ यांच्यासारखा लढवय्या शिलेदार शिवसेनेतून बाहेर पडला होता. तरीही सरकार आलं होतं.
पण या आलेल्या सरकारनं जनतेच्या अपेक्षा मात्र बिलकूलच पुऱ्या केल्या नाहीत , असं ठामपणे म्हणता येतं , अन्यथा १९९९मधील निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ' राष्ट्रवादी काँग्रेस ' च्या रूपानं सवतासुभा निर्माण केलेला असतानाही शिवसेना-भाजपला सत्ता राखता आली नसती काय ? युतीच्या या साडेचार वर्षांच्या काळात शिवसैनिकांची गावोगावातली दंडेली मोठया प्रमाणात वाढल्याचं बघायला मिळालं होतं.
याच काळात शिवसेनेत झालेल्या एका मोठया सत्तांतर नाटयाचा पुढे या संघटनेला तर जबर फटका बसलाच ; शिवाय मराठी माणसांचा जो काही समूह ठाकरे यांच्या मागे उभा होता , त्यातही उभी फूट पडली. हे सत्तांतर होते दस्तूरखुद्द ठाकरे यांनी केलेलं. नवं शतक सुरू झालं , त्याच सुमारास बाळासाहेबांशिवाय संघटनेत आणखी दोन समांतर सत्ताकेंद्रे उभी राहिली होती. उध्दव आणि राज अशी ती केंद्रे होती आणि त्या दोघांमधून विस्तवही जात नाही , हे सा-यांच्याच लक्षात आलं होतं. दोघांचीही कार्यपध्दती , भाषणांची शैली आणि त्यांच्या मागे उभे असणारे तरुणांचे गट यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. खरं तर त्याशिवाय , आणखी एक घराण्यातलंच सत्ताकेंद्र राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाच संघटनेच्या कामात मोठया प्रमाणात हस्तक्षेप करत असल्याचं स्पष्ट दिसू लागलं होतं. ते केंद्र बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांच्या रूपानं अवतरलं होतं आणि १९९९मध्येच म्हणजे राज्याची सत्ता हातातून जाण्याआधीचे काही महिनेच मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून तेथे नारायण राणे यांची स्थापना करण्याचा जो काही निर्णय झाला , त्यात स्मिता ठाकरे यांचा मोठा सहभाग होता , ही बाब लपून राहिलेली नव्हती. पण हळूहळू त्यांचं वर्चस्व झुगारून देण्यात शिवसेनेत कार्याध्यक्षपद नावाचं एक नवंच पद निर्माण करून , त्यावर विराजमान झालेले उध्दव ठाकरे यशस्वी झाले होते. पण राज आणि उध्दव यांच्यातली दरी मात्र कधीही सांधता न येण्याजोगीच होती. उध्दव यांच्या हातात शिवसेनेची जवळपास सारी सूत्रे गेली ती पाच-सात वर्षांपूर्वी आणि त्याची परिणती प्रथम नारायण राणे यांच्यासारखा शिवसेनेचा कोकणातला एक बडा नेता बाहेर पडण्यात झाली. राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि पाठोपाठ राज ठाकरे यांनीही शिवसेनेला ' जय महाराष्ट्र! ' केला. हा वार केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याच नव्हे तर तमाम शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला , हे खरं होतं. पण त्याचवेळी राज ठाकरे यांच्या आक्रमक आणि संपूर्ण मराठी बाण्याच्या घोषणांवर फिदा होऊन महाराष्ट्रातील तरुणाईचा एक मोठा घटक त्यांच्या मागे गेला होता.
शिवाय , राज हे आपल्या आक्रमक भाषणांमुळे रोजच्या रोज शिवसेनेची लक्तरे मीडियातून बाहेर काढत होते. त्यामुळे शिवसेनेची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होऊ न शकल्यामुळेच सन २००७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत सत्ता राखण्यात शिवसेनेला यश आलं आणि उध्दव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब तर झालंच ; शिवाय राज ठाकरे संघटना सोडून गेल्यावरही मुंबईकर मराठी माणूस शिवसेनेच्याच मागे उभा असल्याचं चित्र उभं राहिलं.
खरं तर उध्दव ठाकरे यांनी त्या सुमारास दिलेला ' मी मुंबईकर! ' हा नारा शिवसेनेत धोरणात्मक बदल घडवून आणणारा तर होताच ; शिवाय संकुचित प्रादेशिकवाद आणि अस्मितेच्या बागुलबुव्यातून बाहेर पडून सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने उचललेलं ते एक पाऊल होतं. पण मुंबईतला तरुण आणि नवा मतदार हा त्या घोषणेनं प्रभावित झाला नाही आणि तो राज यांनी पुन्हा उचललेल्या मराठी आक्रमक बाण्यानंच भुलून गेल्याचं २००९मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिलं.
यातून खरं तर मराठी माणसाची पीछेहाटच झाली आहे.
राज ठाकरे यांनी गेल्या तीन वर्षांत जे काही प्रश्न हाती घेतले आणि जे तुकडयातुकडयांचं राजकारण केलं , त्यामुळे मराठी माणसाची प्रतिमा देशभरात कमालीची खराब झाली आहे. या मुंबई महानगराची ' कॉस्मोपॉलिटन सिटी ' अशी एक प्रतिमा केवळ देशातच नव्हे तर जगभरात होती. त्यासही राज यांच्या राजकारणानं तडा गेला आहे.
...आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेची सध्याची अवस्था कमालीची दयनीय झाली आहे. विधानसभेतही या पक्षाला भाजपपेक्षा कमी जागांवर समाधान मानून घ्यावं लागलं आहे आणि त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षनेतेपदही गमवावं लागलं आहे. राजकीय अवकाशातील सत्ताधारी ' स्पेस ' तर शिवसेनेनं १९९९मध्येच म्हणजे अवघ्या साडेचार वर्षांत गमावली होती. आता उरलेल्या विरोधी अवकाशातील मुख्य केंद्रही शिवसेनेच्या हातातून अशारीतीनं गेलं आहे.
त्यामुळेच शिवसेनेत अस्वस्थता तर आहेच ; शिवाय ' पुढे काय ?' असा प्रश्ही निर्माण झाला आहे.
बाळासाहेबांनी कधी स्वत:चं वा शिवसेनेवरही व्यंगचित्र काढल्याचं ऐकिवात नाही. पण त्यांची ती तिरकस-उपहासात्मक शैली ध्यानात घेतल्यास त्यांनी ते काढावयाचं ठरवलंच तर ते कसं काढतील , याची कल्पना करता येऊ शकते.
शिवसेनेची सध्याची अवस्था नेमकी त्या चित्रासारखी होऊन गेलीय आणि ' काही मोजकी मराठी माणसं श्रीमंत होण्यापलीकडे शिवसेनेनं मराठी माणसासाठी नेमकं केलंय तरी काय ?' या ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांनी अलीकडल्या एका मुलाखतीत विचारलेल्या प्रतिप्रश्नांच गांभीर्यही ध्यानात येतंय. खरं तर मराठी माणसांची इतकी मोठी ताकद पाठीशी असताना शिवसेना केवळ मराठी माणसांठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी विधायक स्वरूपाचे काही ठोस कार्यक्रम राबवू शकली असती. प्रत्यक्षातलं चित्र ज्या कुठल्या महापालिकेत सत्ता मिळेल , तिथल्या टक्केवारीतच शिवसेनेनं अधिक रस घेतल्याचं आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या पाठीशी लाखांच्या संख्येनं उभं राहणा-या शिवसैनिकांनी दिलेली संधी शिवसेनेनं गमावली आहे , असंच दुर्दैवानं म्हणावं लागतंय..

महाराष्ट्र राज्याची स्थापना
१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य स्थापनेच्या दिवशी मराठी माणसाला जो अत्यानंद झाला, तो शब्दांत वर्णन करण्यापलीकडचा आहे. कारण त्याआधी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले होते. 'महाराष्ट्र राज्य तुम्हाला मिळणार नाही', असे देशातील मोठे-मोठे पुढारी ठणकावून सांगत होते. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील प्रजेच्या मनाविरुद्ध द्विभाषिक राज्य लादले गेले होते. सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरूद्ध उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत यशवंतराव चव्हाणांसारखे नेते मोठ्या चातुर्याने आणि जबाबदारीने लोकांचा असंतोष काबूत ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत होते. पण आपणास नागवले जात आहे, आपला हक्क डावलला जात आहे याची चीड आणि संताप मराठी मनात इतका उफाळलेला होता, की वाटेल तो त्याग करण्यास मराठी माणूस सिद्ध झाला होता. संताप आणि असंतोष मनामनांत खदखदत होता. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन करणे, असे अनिवार्य आहे ते इंदिरा गांधींजींच्यामार्फत नेहरूंना पटवून देण्याचा सफल प्रयत्न झाला. दरम्यान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य झालेच पाहिजे, अशा विचारांचे झाले होते. बॅ. नाथ पै, स. का. पाटील असे नेतेही 'आता महाराष्ट्र राज्य झाल्याशिवाय गत्यंतर नाही', अशा मताचे होते आणि महाराष्ट्र राज्य होणार, अशी घोषणा झाली. 'संयुक्त महाराष्ट्र उगवतो माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा' हे अमरशेखांच्या अमरवाणीतील बोल खरे ठरले होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस जसजसा जवळ येत चालला तसतसे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील उत्साहाला उधाण येत चालले.
मी त्यावेळी 'शब्दरंजन स्पर्धा' चालवत होतो. महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या मंगल दिवशी आपलाही हातभार लावावा असे वाटले आणि महाराष्ट्र गौरवाच्या गीतांची एक स्पर्धा जाहीर केली. त्या स्पधेर्त अनेक उदयोन्मुख कवींनी भाग घेतला. शिवाय महाराष्ट्राचे प्रतिथयश कवी यशवंत, गिरीश, काव्यविहारी स. अ. शुल्क, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगुळकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, सोपानदेव चौधरी, पु. शि. रेगे, पी. सावळाराम इत्यादींकडून महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त खास लिहून घेऊन त्या कवितांचा अंतर्भाव २७ एप्रिल १९६० रोजी प्रसिद्ध झालेल्या 'महाराष्ट्र गौरव गीते' या पुस्तकात केला गेला. ६४ पानांच्या या पुस्तकांची किंमत केवळ दीड रुपये होती. माझे मित्र गंगाधर महाम्बरे यांनी त्यांचे संपादन केले होते. अभिमानाची गोष्ट अशी संग्रहासाठी या मुद्दाम लिहिलेल्या काही कविता पुढे खूपच लोकप्रिय झाल्या. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे शाहीर साबळे यांनी गेली ५० वषेर् गर्जत ठेवलेले गीत कवी राजा बढे यांनी लिहिलेले आहे आणि ते संग्रहासाठी मुद्दाम लिहिले. 'महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जयजय राष्ट्र महान, कोटी कोटी प्राणांतून उसळतो एक तुझा अभिमान' हे चकोर आजगावकरांचे गाजलेले गाणेही याच संग्रहासाठी लिहिलेले आहे.
हा संग्रह महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अर्पण केला आहे. आनंदाची बाब अशी की, २७ एप्रिलला म्हणजे त्याकाळच्या शिवजयंतीच्या दिवशी मुंबईचे एक प्रमुख वृत्तपत्र विक्रेते यशवंत सुवेर् यांच्या जीपगाडीतून आम्ही शिवनेरीला गेलो होतो. तेथे गडाच्या पायऱ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांची भेट झाली आणि हे पुस्तक प्रत्यक्ष त्यांच्या हाती देण्याचा योग आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणी शिवजयंतीच्याच दिवशी यशवंतरावांना अर्पण केलेला महाराष्ट्र गौरव गीतांचा हा संग्रह त्यांच्या हाती देता आला, हा एक मोठा योगायोगच होता. या संग्रहातील अनेक गीते त्या त्या कवींच्या संग्रहात नंतर अंतर्भूत झाली, पण ती प्रथमत: प्रकाशित झाली ती याच संग्रहात. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी आपलाही काही हातभार लागला, याचे फार मोठे समाधान या ग्रंथ प्रकाशनामुळे लाभले, हाच मोठा आनंदाचा भाग!..
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या मंगल दिवसासाठी त्याकाळी शब्दरंजन स्पर्धा चालवणाऱ्या जयंतराव साळगावकर यांनी महाराष्ट्र गौरव गीतांची स्पर्धा जाहीर केली. कवी यशवंत, गिरीश, काव्यविहारी, स. अ. शुक्ल, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगुळकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, सोपानदेव चौधरी, पु. शि. रेगे, पी. सावळाराम यांनी खास कविता लिहिल्या. त्यांचा 'महाराष्ट्र गौरव गीते' या पुस्तकात समावेश झाला.

१०६ हुतात्म्यांना सलाम
संयुक्त महाराष्ट्राची मागणी दडपून टाकण्यासाठी नोव्हेंबर १९५५ रोजी मोरारजी सरकारने विधानसभेकडे जाणाऱ्या निषेध मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरिष्
ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाऊंटनवर १५ माणसे ठार झाली. पुढे दोन महिन्यांच्या अवधीतच १५ ते २० जानेवारी १९५६ दरम्यानच्या दिवसांत मुंबईत व महाराष्ट्रात हत्याकांड पेटलं. अनेक बळी गेले. धारातीर्थी पडलेल्या त्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक पहिल्या गोळीबाराच्या जागी १ ऑगस्ट १९६३ या लोकमान्य टिळक पुण्यस्मृतीदिवशी उभारले.
..................
सीताराम बनाजी पवार
गोविंद बाबूराव जोगल
जोसेफ डेव्हिड पेजारकर
पांडुरंग धांेडू धाडवे
चिमणराव डी. शेठ
गोपाळ चिमाजी कोरडे
भास्कर नारायण कामतेकर
पांडुरंग बाबाजी जाधव
रामचंद सेवाराम
बाबू हरी दाते
शंकर खोटे
अनुप महावीर
धर्माजी गंगाराम नागवेकर
विनायक पांचाळ
रामचंद लक्ष्मण जाधव
सीताराम गणपत म्हादे
के. जे. झेवियर
सुभाष भिवा बोरकर
पी. एस्. जॉन
गणपत रामा नानाकर
शरद जी. वाणी
सीताराम गयादीन
बेदी सिंग
गोरखनाथ रावजी जगताप
रामचंद भाटिया
महमंद अली
गंगाराम गुणाजी
तुळशीराम पुंजाजी बेलसरे
बंडू गोखले
देवाजी सखाराम पाटील
निवृत्ती विठोबा मोरे
शामलाल जेठानंद
आत्माराम पुरूषोत्तम पानवलकर
सदाशिव महादेव भोसले
बालण्णा मुतण्णा कामाठी
भिकाजी पांडुरंग रंगाटे
धांेडू लक्ष्मण पारडुले
वासुदेव सूर्याजी मांजरेकर
भाऊ सखाराम कदम
भिकाजी बाबू बावस्कर
यशवंत बाबाजी भगत
सखाराम श्रीपत ढमाले
नरंेद नारायण प्रधान
रत्नू गोदीवरे
शंकर गोपाळ कुष्टे
सय्यद कासम
दत्ताराम कृष्णा सावंत
भिकाजी दाजी
बबन बापू भरगुडे
अनंत गोलतकर
विष्णु सखाराम बने
किसन विरकर
सीताराम धांेडू राड्ये
सुखलाल रामलाल वंसकर
तुकाराम धांेडू शिंदे
पांडुरंग विष्णू वाळके
विठ्ठल गंगाराम मोरे
फुलवी मगरू
रामा लखन विंदा
गुलाब कृष्णा खवळे
एडवीन आमब्रोझ साळवी
बाबूराव देवदास पाटील
बाबू महादू सावंत
लक्ष्मण नरहरी थोरात
वसंत द्वारकानाथ कन्याळकर
ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
विठ्ठल दौलत साळुंखे
गणपत रामा भूते
रामनाथ पांडुरंग अमृते
मुन्शी वझीर अली
परशुराम अंबाजी देसाई
दौलतराम मथुरादास
घनश्याम बाबू कोलार
विठ्ठल नारायण चव्हाण
धांेडू रामकृष्ण सुतार
देवजी शिवन राठोड
मुनीमजी बलदेव पांडे
रावजीभाई डोसाभाई पटेल
मारूती विठोबा म्हस्के
होरमसजी करसेटजी
भाऊ कांेडिबा भास्कर
गिरधर हेमचंद लोहार
धांेडो राघो पुजारी
सत्तू खंडू वाईकर
व्हदयसिंग दारजेसिंग
गणपत श्रीधर जोशी (नाशिक)
शंकर विठोबा राणे
माधव राजाराम तुरे (नाशिक)
पांडू महादू अवरीकर
मारूती बेन्नाळकर (बेळगाव)
विजयकुमार सदाशिव भडेकर
मधुकर बापू बांदेकर

शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा
शाळेने पत्रक काढलं,
'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यायोगे ही
मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!' आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की, अगदी एक विजार,एक सदरा असेल, तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती. तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची. मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,
"मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले,
"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता.
"कशावरून म्हणता?"
"सर.त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो, तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी."
मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली.पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल?की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे.
एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, "पाहिलंस!हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे..."
उत्तर पत्रिकेचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो... अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही..! असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता! शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती.
त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले.
'मयूर जाधव, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस'
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले,
"खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या
रकमेत सामावणार आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं,
"सर,त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे !"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा...
"सर,रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका."
"अरे,काय बोलतोयस तुला समजतय का?"
"चुकतही असेन मी. वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी ......
मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....?
"सर,मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते.
शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण....?"
"सर, विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर,मी
गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो,
"ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
"सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी Second Hand वापरतोय... खरयं! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर...सर, सांगा ना, मी गरीब कसा?" मयूर मलाच विचारत होता
आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरयं मयूर.पण तुला या पैशाने मदतच......."
"सर,मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! "
"म्हणजे?"
"वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो.सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात... मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते..... म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगळे काम करतात. काम म्हणज कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर,वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही.... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर,माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु.ल.देशपांडे यांच्या
स्वाक्षरीचं पत्र आहे. .
.......सर, आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता.
सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.
अभावितपणे मी विचारलं, "व्यायामशाळेतही जातोस?"
"सर, तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो."
अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.
"मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा...."
"म्हणूनच म्हणतो सर......!"
"हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून,हे पारितोषीक तरी...."
"सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचं, सावरकरांचं चरित्र वाचलं, हेलन केलरचं चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल...
सर.....प्लीज.....!"
वाचनानं,
स्पर्धांतल्या सहभागानं,
कलेच्या स्पर्शानं,
कष्टानं.......
त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती,
संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते. शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून,परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा !
श्रीमंत ! सर्वात श्रीमंत!!!

Tuesday, July 12, 2011
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
पावसा सोबत वाहतोय आज..
गार गार वारा...
वेगळाच फुलून आलंय आज..
हा निसर्ग सारा...
त्यालाही चाहूल लागली आहे...
आज दिवस आहे खास...
त्याने पण घेतलाय बघ..
तुझ्या वाढदिवसाचा ध्यास...
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
गार गार वारा...
वेगळाच फुलून आलंय आज..
हा निसर्ग सारा...
त्यालाही चाहूल लागली आहे...
आज दिवस आहे खास...
त्याने पण घेतलाय बघ..
तुझ्या वाढदिवसाचा ध्यास...
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
मराठी प्रेम कविता
तिच माझ भांडण मराठी प्रेम कविता
123.jpg
काही कळतच नाही मला
नक्की कुणाचे चुकतंय काय?
असे तर दुःखी होतोय दोघेही आपण
ह्यावर नक्की उपाय काय?
नाही ग माझ्या मनात
तुला वाटते तसे काहीही नसते
न भांडण्यासाठी मनाची
पुर्ण तयारीही असते
पण नेमके त्याच दिवशी
असे काही अचानक घडते
आणी मग तुझ्यामाझ्यात
नेहमीच कश्यावरुन बिनसते
30.jpg
मान्य आहे की
आहे मी गरम डोक्याचा
पण तु तरी मला समजुन घे
अग त्रास होतो मला ही सगळ्याचा
माझी बाजुजी शांतपणे ऐकुन घे
मी माझे नेहमीचे रडगाणे वाजवतो
आणी मग तु माझ्यावर चिडतेस
आणी मग मागचा पुढचा
विचार न करता
वर माझ्यावरच वैतागतेस
images.jpg
तुला फोन करायला जावे तर
तुझा मोबाईल स्विच ऑफ करतेस
सांग ना मला एकदा
तु मला असे का सतावतेस
भांडतेस माझ्याशी अन
मग स्वतःसुध्दा रडतेस
माहीतीय नाही चिडणार तुझ्यावर
तरीही माझी काळजी करतेस
23.jpg
राग शांत झाला की
स्वतः फोन करतेस
लाडी-गोडीने हाका मारुन
वर मस्काही लावतेस
माहीतीय मला की
तु माझ्यावर खुप प्रेम करतेस
म्हणुनच का कदाचीत
नेहमीच तु माझ्याशी भांडतेस.
123.jpg
काही कळतच नाही मला
नक्की कुणाचे चुकतंय काय?
असे तर दुःखी होतोय दोघेही आपण
ह्यावर नक्की उपाय काय?
नाही ग माझ्या मनात
तुला वाटते तसे काहीही नसते
न भांडण्यासाठी मनाची
पुर्ण तयारीही असते
पण नेमके त्याच दिवशी
असे काही अचानक घडते
आणी मग तुझ्यामाझ्यात
नेहमीच कश्यावरुन बिनसते
30.jpg
मान्य आहे की
आहे मी गरम डोक्याचा
पण तु तरी मला समजुन घे
अग त्रास होतो मला ही सगळ्याचा
माझी बाजुजी शांतपणे ऐकुन घे
मी माझे नेहमीचे रडगाणे वाजवतो
आणी मग तु माझ्यावर चिडतेस
आणी मग मागचा पुढचा
विचार न करता
वर माझ्यावरच वैतागतेस
images.jpg
तुला फोन करायला जावे तर
तुझा मोबाईल स्विच ऑफ करतेस
सांग ना मला एकदा
तु मला असे का सतावतेस
भांडतेस माझ्याशी अन
मग स्वतःसुध्दा रडतेस
माहीतीय नाही चिडणार तुझ्यावर
तरीही माझी काळजी करतेस
23.jpg
राग शांत झाला की
स्वतः फोन करतेस
लाडी-गोडीने हाका मारुन
वर मस्काही लावतेस
माहीतीय मला की
तु माझ्यावर खुप प्रेम करतेस
म्हणुनच का कदाचीत
नेहमीच तु माझ्याशी भांडतेस.
विठ्ठल हा कितवा अवतार?
विठ्ठल हा कितवा अवतार?
[image: images.jpg] विष्णुभगवानांनी घेतलेल्या दशावतारांची नांवे सर्वांनाच
तोंडपाठ असतात. त्यामधील मत्स्य, कूर्म आणि वराह हे पहिले तीन अवतार
प्राणीवर्गांत घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल सुसंगत अशी फारशी माहिती सर्वांना
ठाऊक नसते. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करून त्याने
हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारले आणि बटु वामनाच्या वेषात येऊन महाबळीराजाला
पाताळात गाडले. एवढी कामे करण्यापुरतेच श्रीविष्णूने हे दोन अवतार घेतले आणि
कार्यभाग संपताच ते पुन्हा अदृष्य होऊन गेले. अशा रीतीने त्यांच्या पहिल्या
पांच अवतारांमधील संपूर्ण जीवनाची कथा सामान्यांना ज्ञात नसते. त्यानंतरचे
परशुराम, रामचंद्र आणि श्रीकृष्ण या तीन अवतारांबद्दल अनेक आख्याने ऐकलेली
असतात. या अवतारांमधील त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचे बालपण कसे गेले, मोठे
झाल्यावर त्यांनी कोणते जीवितकार्य केले वगैरेची मात्र खूप सविस्तर माहिती
बहुतेक लोकांना ठाऊक असते. शेवटचे दोन अवतार बुद्ध आणि कल्की यांच्याबद्दल
मात्र थोडा संभ्रम आहे.
दहावा कल्की अवतार कधी होणार आहे कोणास ठाऊक? तो होऊन गेला आहे असेही कांही लोक
समजतात, पण ‘विष्णूचा अवतार’ म्हणून ओळखला जावा एवढा मोठा महापुरुष कांही
अलीकडच्या काळात होऊन गेलेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धालाच
‘विष्णूचा नववा अवतार’ मानले जाते. पण पंढरपूरचा विठ्ठल हाच ‘बुद्ध’ नांवाचा
नववा अवतार आहे असे समजणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. हा समज कधी आणि कुठे
निर्माण झाला आणि कोठपर्यंत पसरला ते माहीत नाही, पण मी तो लहानपणीच ऐकला होता
आणि इतिहासाच्या पुस्तकातून गौतमबुद्धाची ओळख होण्यापूर्वी मी ही तसेच समजत
होतो. सह्याद्री वाहिनीवरील विठ्ठलाची माहिती देणारा एक बोधपट काल पाहिला
त्यांतसुद्धा असेच विधान केलेले दिसले. त्याबद्दल थोडे स्पष्टीकरणसुद्धा दिले
गेले.
[image: index.jpg]
भक्त पुंडलीकावर प्रसन्न होऊन भगवान विष्णु त्याला भेटायला त्याच्या पंढरपूर
येथील जागी आले. नेमका त्या वेळेस तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क होता,
म्हणून त्याने विष्णूच्या दिशेने एक वीट भिरकावून देऊन तिच्यावर थोचा वेळ उभे
रहायला सांगितले. पुंडलीकाला पुरसत मिळताच त्याने विष्णूला वंदन करून त्याची
क्षमा मागितली आणि त्याने कशासाठी येणे केले ते विचारले. विष्णूने आपण
त्याच्यावर प्रसन्न झालो असल्याचे सांगून कोणतेही वरदान मागायला सांगितले, पण
“आपण आपल्या मातापितरांच्या सेवेत पूर्णपणे संतुष्ट आहोत, आपल्याला आणखी कांही
नको” असे पुंडलीकाने सांगितले. “स्वतःसाठी कांही नको असल्यास इतरांसाठी माग”
असे म्हणताच “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” असे
मागणे त्याने मागितले आणि देवाने “तथास्तु” म्हंटले. तोच त्याचा पुढचा अवतार
समजायचा कां नाही यावर दुमत होऊ शकते.
‘अवतरणे’ म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक
‘अवतार’ ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम, रामचंद्र व
श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही.
गौतमबुद्धाने मात्र ‘सिद्धार्थ’ या नांवाने मनुष्यजन्म घेतला होता हा एक फरक
आहे. विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा. विष्णूच्या
दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी
त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो त्यातही
विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश
नाही. गौतमबुद्धाचा आहे की नाही ते माहीत नाही, पण विठ्ठलाच्या नांवाला
शास्त्रपुराणांची मान्यता मिळालेली होती असे दिसत नाही.
विठ्ठल आणि गौतमबुद्ध या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोघांनीही
कुठल्या दैत्याचा संहार वगैरेसारखी हिंसा केलेली नाही. विष्णूच्या हातात नेहमी
सुदर्शनचक्र, शंकराकडे त्रिशूळ किंवा श्रीरामाकडे धनुष्यबाण असतात, पण
पांडुरंगाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तो शांत
मुद्रेने उभा असतो. गौतमबुद्धाने तर क्षत्रियधर्माचा त्याग करून अरण्यवास
पत्करला आणि विश्वबंधुत्वाचा उपदेश जगाला केला. विठ्ठलाच्या भक्तांनी म्हणजेच
सर्व संतांनीसुद्धा आपसातील प्रेम वाढवण्याचाच संदेश सगळ्या लोकांना दिला.
विठ्ठलाने त्यांना परोक्ष अपरोक्ष रूपाने सतत सहाय्य केले असल्याच्या आख्यायिका
आहेत. “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” ही मागणी अशा
रीतीने पूर्ण होतांना दिसते.
आजच्या काळातील बौद्धधर्मीय लोक आपला ‘धम्म’च वेगळा मानतात आणि चीन, जपान,
श्रीलंका यासारख्या परदेशातून आलेले भिख्खू त्यांच्या धार्मिक विधींचे संचलन
करतांना दिसतात. गौतमबुद्धाला श्रीविष्णूचा अवतार मानणे या धम्मपंडितांना कितपत
मान्य आहे कोणास ठाऊक? तसे नसेल तर कदाचित आणखी कांही वर्षांनी तरी विष्णूच्या
दशावतारातील नवव्या अवताराची वेगळी ओळख करावीच लागेल.

आमचा देव
आमचा देव
जगात वावरतो एकटे आम्ही
आमचा देव बरोबर चालतो
जिवनाच्या कोर्टात आरोपी आम्ही
आमचा देव साक्ष आणि न्याय देतो
अंधारात भटकतो बिंधास्त आम्ही
आमचा देव हातातला कंदिल बनतो
हातात लेखणी घेतो आम्ही
आमचा देव कविता करतो
आमचं काम करतो आम्ही
आमचा देव बाकीचं संभाळतो
पुरात बुडता बुडता वाचतो आम्ही
आमचा देव आम्हाला खांद्यावर घेतो
दु:खासाठी कठोर ढाल आम्ही
आमचा देव सुखाची तलवार धरतो
त्याच्या मुलासारखं चुकतो आम्ही
आमचा देव चटके देऊन सुधारतो
उघड्या रानात स्वच्छंद झोपतो आम्ही
आमचा देव आमच्यावर कृपा पांघरतो
जगात वावरतो एकटे आम्ही
आमचा देव बरोबर चालतो
जिवनाच्या कोर्टात आरोपी आम्ही
आमचा देव साक्ष आणि न्याय देतो
अंधारात भटकतो बिंधास्त आम्ही
आमचा देव हातातला कंदिल बनतो
हातात लेखणी घेतो आम्ही
आमचा देव कविता करतो
आमचं काम करतो आम्ही
आमचा देव बाकीचं संभाळतो
पुरात बुडता बुडता वाचतो आम्ही
आमचा देव आम्हाला खांद्यावर घेतो
दु:खासाठी कठोर ढाल आम्ही
आमचा देव सुखाची तलवार धरतो
त्याच्या मुलासारखं चुकतो आम्ही
आमचा देव चटके देऊन सुधारतो
उघड्या रानात स्वच्छंद झोपतो आम्ही
आमचा देव आमच्यावर कृपा पांघरतो
विठल.! विठल ! विठल ! विठल.!
आलो तुझ्या पायी...
विठू राया माझ्या ...
घे तुझ्या पदरात...
पाप पुण्य हृदयातील माझ्या..
पायी ठेऊन मस्तक,
आलो तुला मी शरण,
शमा कर माझे पाप,
घेतो आता तुझे नाम..
विठल.! विठल ! विठल ! विठल.! विठल ! विठल ! विठल.!
ताल वाजे
मृदंग वाजे,
वाजे मोहन वीणा
माउली निघाले पंधर पुरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला...
!! जय जय राम कृष्ण हरी !!
विठू तुझ्या मंदिरात,
तुळस किती सुखावते..
नाद भरल्या गाभाऱ्यात,
सुगंधात विहरते..!

मी पुन्हा हरवत जातोय..
मी पुन्हा हरवत जातोय..
त्याच जुन्या आठवणीत...
काही काळासाठी ठेवल्या होत्या...
ज्यांना हृदयात साठवणीत...
तुझ्या साठी आणलेली फुले..
तुझी वाट पाहून हिरमसून गेली होती..
तुला येताना बघताच...
ती नव्याने फुलून आली होती
तुझ्या अल्लड पणावर...
जीव माझा झाला फिदा...
पाहताच जीव घायाळ झाला...
अशी मोहक तुझी अदा...
त्याच जुन्या आठवणीत...
काही काळासाठी ठेवल्या होत्या...
ज्यांना हृदयात साठवणीत...
तुझ्या साठी आणलेली फुले..
तुझी वाट पाहून हिरमसून गेली होती..
तुला येताना बघताच...
ती नव्याने फुलून आली होती
तुझ्या अल्लड पणावर...
जीव माझा झाला फिदा...
पाहताच जीव घायाळ झाला...
अशी मोहक तुझी अदा...
रडवणं असतं अगदी सोपं
रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसवुन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसवुन
निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला
नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार
एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत..
बघा जरा कुणाला हसवुन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसवुन
निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला
नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार
एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत..
Subscribe to:
Posts (Atom)