Thursday, January 17, 2013

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं. मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं, असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं. पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर, हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .

आयुष्य प्रत्येक पावलावर नव काही शिकवणार,

आयुष्य हळू हळू चालत राहणार, आयुष्य नेहमी एका वेगळ्या वळणावर असणार, कधी अमावसेच्या रात्री सारख अंधारमय असणार, तर कधी पोर्णीमेच्य चंद्रा सारख कले कले नि वाढणार, आयुष्य कधी श्रावण सरीन सारख रिमझिम सुखद बरसणार, आयुष्य कधी चैत्रातल्या कडक उन्हा सारख पोळवनार, आयुष्य कुणासाठीच न थांबणार, आयुष्य सतत पुढे जात राहणार, आयुष्य प्रत्येक पावलावर नव काही शिकवणार, आयुष्य अनुभवाचे धडे देणार, आणि आयुष्य आठवणीची शिदोरी देणार, हेच आयुष्य पावला पावलावर जगणं शिकवणार.......

ओम नमो भागवतेय साईनाथ नंदाय///// आला हो आला साईबाबा आला

1111 तुजविण साई नाही मजला कुणी, मी तुझे लेकरू तू माझा धनी तुझ्या नामात रंगू दे वाणी ,गाऊ दे रे तुझी गोड गाणी मी अनाथ देई साथ मज संग येउनी , तुजवीण साई ...१.. आल कीर्ती तुझी रे ऐकुनी , माया जात नाही इथे कोणी कृपा करी मजवरी दे झोळी भरुनी ,तुजवीण साई ..२.. तुझ्या दर्शनाची आस मोठी ,म्हणुनी आलो मी भेटीसाठी ये समोरी लवकरी भेट दे या क्षणी ,तुजवीण साई ..३... 2222 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज बालयोगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज कि जय.
साई माझा साधा भोळा जनतेला हो त्याचा लळा साई माझा दुबळयांचा आधार करितो गोर गरीबांचा उद्धार माझे साई मी साईचा . 333333 शिणले रे डोळे ही थकली काया माझ्यावरची साई का रे आटली माया ।। दर दिवशी तुझी रे मी केली सेवा नाही पुजिले मी कधी दुसर्या देवा तरी का दुरी साई माझ्या वरी कितीदा पडू साई तुझ्या पाया ।।१।। शिणले रे ...... वाईट ना वागलो कुणाशी कधी गरिबांच्या सेवेची ना सोडली संधी जनसेवा असे खरी ईश्वर सेवा का वेळ लावता मजला ताराया ।।२।।शिणले रे ........ नाम गाता तुझे रंगल्या रे राती ना पर्वा जगाची , ना कशाची भीती साईलीला भजनमाला विनवी तुला प्रिय भक्तांना ये रे वरदान द्याया ।।3।।शिणले रे ........ साईराम साईराम 44444 22222222222222 आला हो आला साईबाबा आला त्याने सर्वांना आधार दिला असा जगी कोणी संत नाही झाला ।। धृ ।। बाबांना पाहून लोकांना वाटले ढोंगी असेल हा फकीर चमत्कार त्यांचे पाहून सारे पाय धरण्या झाले अधीर तेव्हा झाले असे लोक वेडेपिसे त्यांनी बाबांवर विश्वास केला असा जगी कोणी संत नाही झाला ।। १ ।। रोगराई आणि दुख दारिद्र्याने शिर्डी गाव व्यापलेले होते परमेश्वराने साई रूपाने बाबांना पाठविले तेथे अशी केली करनी साई आला धरणी त्याने शिरडीचा उद्धार केला असा जगी कोणी संत नाही झाला ।। २ ।। गुरु दत्त कृपेने बाबांना लाभले सिध्द हस्त संतांचे पद म्हणून कोटी भक्तांना लागला बाबांच्या भक्तीचा छंद झाली जगाला जाण दिला सदगुरु चा मान चला वाहुया भाव पुष्प माला असा जगी कोणी संत नाही झाला ।।३।। 3333333333

मानवा तू विसरू नको शिर्डीच्या या साईला

अरे मानवा तू या जन्मी येवून काय केले अरे शिर्डीच्या साईबाबाचे नाव मुखी कधी न घेतले
मानवा तू विसरू नको शिर्डीच्या या साईला गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला ..2 सदगुरुला सदगुरुला विसरू नको सदगुरुला …… बालपण गेले तुझे शिकण्यात खेळण्यात तरुणपण घालवू नको भरकटून वासनेत लग्न केल्यावर तू होवू नको बेईमान प्रेम फास पडल्यावर होवू नको बेभान आई - बाबांना बाळग तू सोडू नको वाऱ्यावर इतरांचे ऐकू नको बुद्धी ठेव ताळ्यावर आई - बाबांची कमाई होती जगण्याला आजवर वाईट व्यसनी लागू नको घालवू नको पैसा बाटल्यांवर दारू सिगारेट पिवूनी मोडू नको संसार अहंकारी डोक्याने त्यावर फिरवू नको नांगर कष्टाविना फळ नाही फलाविना ना संतुष्टी परोपकार करुनी मिले पुण्य होशील तू आनंदी पैसा अडका इथेच राही कीर्ती फक्त उरणार मानवाचा जन्म तुला पुन्हा नाही मिळणार निर्जीव होता काय तुझी जाईल ती सरणाला थोडे दिवस रडतील परी कुणी नसणार तुझ्या साथीला ..¶1¶ जन्म दिलाय ज्यांनी ते आई - बाबाच आपले दैवत आशीर्वाद घ्या त्यांचे सुखी ठेवा त्यांना सदैव जन्म आला तो मरणार हे सत्य आहे अटल कीर्ती रूपे उरण्याचे तुम्ही बांधा मनी अटकळ संकटी पडल्यावारीच तुम्ही नाव घेता देवाचे नशिबी तुमच्या दुख आहे ते फळ मच्या कर्माचे देवाधी देव हि सुटले नाही नशिबाच्या फेर्यांतून भोगली ती दुखे त्यांनी गोड मानुनी कर्मातून मनी शांती मिळविण्या मुखी नाव घे तू साईच मायेने गोन्जारुनी साई तुला प्रेम देईल आईच साईलीला अजब न्यारी जा तू त्याच्या भक्तीला जाईल जेव्हा साई दरबारी लागेल त्याच्या भक्तीला सोड सोड बंधने सारी वारी कर तू शिर्डीची जप तप करुनी साईची प्राप्तीकर तू सुखाची शिर्डीला त्या जावून ये तू शरण जा तू साईला भक्तीने उद्धरून घे तू आपल्या या जन्माला आमोल घायाळ

तुझा तो सुंदर चेहरा जणू जास्वंदी सोबत मोगरा

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे तुझा तो सुंदर चेहरा जणू जास्वंदी सोबत मोगरा तुझे ते सोणेरी रूप जसे साखरेत मुरलेले तुप त्यातल प्रत्येक स्वाद मलाच चाखायचा आहे एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे तुझे ते लांब रेशमी केस हलकेच हवेत उडत तुला झुल्यात बसवण्यासाठी मन माझे तडपडत त्या स्वप्नाच्या झुल्यात मला पण झुलायचे आहे एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे तु जवळून माझ्या जाताना येत असे सुगंधी वारा मनात माझ्या बरसे जणू पावसाच्या धारा त्या सुगंधी पावसात तुझ्याच बरोबर भिजायच आहे एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे

हिरवेगार हे गवत नि हिरवा हा मळा

♥ ♥ ♥ ♥ ♥हिरवेगार हे गवत नि हिरवा हा मळा ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ अवतीभवती झाले नातवंड आपले गोळा ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ अडकलो बंधनात आपण घालून गळ्यात गळा ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ सुटता न सुटे असा लागला मज तुझ्या प्रीतीचा लळा. ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ आमोल घायाळ♥ ♥ ♥ ♥ ♥

आठवण आली की अलगद उमलायचे,

नाते तुझे हळुवार जपायचे, आठवण आली की अलगद उमलायचे, नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे, दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे,?मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे, या वेडया मनाला कोन समजावयाचे,? सागं आठवण आली की काय करायचे,? तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे. मनातले हे बोल सांग कधी कळायचे? सागं आठवण आली की काय करायचे,नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे, सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे, येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे,?फोन मात्र मीच करायचं, H…..R… U मत्र तू बोलायचे, तु दिसला की डोळे भरुण पहायचे, ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे, सागं आठवण आली की काय करायचे,????.♥(