हृदयाचे रिकामी कोपरे...
तुझ्या स्मृतींनी भरलेले....
डोळ्याच्या पापण्यांना मात्र...
अश्रुंनी मोहरलेले..
मिठीत तुझ्या..
एक वेगळीच मिठास होती...
चुंबनाची गोडी तुझ्या...
माझ्या साठी खास होती...
कवेत तु यावे...
मी मलाच विसरावे..
स्वप्नच की भास हे..
माझे मलाच न कळावे..
तु जवळ नसताना ही..
सतत तुझा आभास आहे...
गहिवरल्या मिठीत माझ्या..
सखे तुझाच भास आहे..
No comments:
Post a Comment