Monday, November 7, 2011

जगणे मरणे तुझ्यात....

होते नभात चांदणे टिपूर
मनात होते गाण्याचे सूर
दिलीस मला हळूच हाक
जळात आले तरंग लाख

मागणेही तुझे तेच तेच
लाजणेही माझे तेच तेच
ओठावरी अमृत संस्कार
ओठावाचून जरी उच्चार

कुठे शेवट कुठे किनारा
मोर फुलवितो पिसारा
धडधडते जरी उर आत
इंद्रधनुष्यात रंग सात

फिरून वेदानांना अंती
जगणे मरणे तुझ्यात
उरले होते सूर मागे
विरले चांदणे नभात....

No comments:

Post a Comment