Thursday, November 10, 2011

प्रेम म्हणजे मी अन तू....

तुला पहिले कि..
हृदयात वसंत फुलतो....
तू लाजून हसलीस कि....
जीव माझा हळहळतो ...




आठवते तुला....
मी एकदा तुझे हात धरले होते ...
तेव्हा तुझे डोळे...
अश्रूंनी भरले होते...



प्रेम म्हणजे मी अन तू....
प्रेम म्हणजे माझ्यात तू....
प्रेम म्हणजे स्वप्नात तू....
प्रेम म्हणजे साक्षात तू....




तू हातात हात देशील...
मी साथ देण्याचे वचन देतो....
जाता जाता तुला ...
माझ्या प्रेमाची साठवण देतो....

No comments:

Post a Comment