उस पेटला आखिर गोड धुरात
कापूसही आता शर्थीने धुपतोय,
वस्त्र कापसाचंही नशिबी नाही
न्यायासाठी बळीराजा खपतोय..!!
घाम गाळतोय एकीच्या लढाईत
पोटाला बसतोय जीवघेणा चिमटा,
अस्मानी-सुलतानी नशिब भोगात
Package चं लोणी लाट्तोय भामटा..!!
कृषीप्रधान म्हणवते भावी महासत्ता
शेतकी धोरणांना वाटण्याच्या अक्षता,
आभाळाऐवजी पाऊस डोळ्यात दाटतो
स्वार्थावला वाली गाभणली दक्षता..!!
योगवाले, उपोषणवाले टेकतील हात
दिखाऊपणाचं सोंग पडेलं महागात,
कालचे पाढे पंचावन्न खूब म्हणत पुन्हा
२०१४चा अभागी मतदाता येईल रंगात..!!
कायदा - अंमलबजावणीचा आभासी खेळ
संसदेपेक्षा श्रेष्ठ असेलं का गांधीवादी माणूस?
काळ्या बॅंका आता चक्क डोईजड होताहेत
आतातरी फिटेलं का गुंतवणुकीची हौस..!!
बलिदानाचं रक्त खचितंच स्वर्गी टाहो फोडेलं
कुंपणानेचं बांधलंय भ्रष्टाचाराशी 'सु'-संधान,
धुळीस मिळतंय ऐतिहासिक स्वप्न उष:कालाचं
कुठल्या तोंडाने म्हणणार "मेरा भारत महान"..??
No comments:
Post a Comment