डोळ्यांची पणत्या बघ पाण्याने भरलेल्या
सखे काजळ वात त्यात सांग जळेल कशी ती
अगं सोड अबोला हा,बरा ना दिसे रुसवा तुझा
अश्याने.. ओठांची कळी सांग खुलेल कशी ती
ती म्हणाली काल जेव्हा
ती म्हणाली काल जेव्हा
उगवेल ना पहाट ?
मी म्हणालो साथ देत
शोधू या ही वाट ....
ती म्हणाली काल जेव्हा
चालशील संगतीने ?
मी म्हणालो साथ देण्या
आलोय मी सवडीने
ती म्हणाली काल जेव्हा
दु;खे सारी संगतीला
मी म्हणालो दु;खाविना
अर्थ काय जगण्याला ?
ती म्हणाली काल जेव्हा
कसा होईल संसार ?
मी म्हणालो सोड प्रश्न
येईल प्रेमाचा बहर
No comments:
Post a Comment