रोज रोज सूर्य उगवतो ...रोज मावळतीला जातो ...
अगदी न चुकता हे चालूच राहतं ..
तुझी आठवणही काहीशी अशीच.....
रोजच येते ..येतंच राहते ..मावळत मात्र नाही ...
...तुझी आठवण येते नी मनाचा तळ ढवळून काढते
तुझ्या सहवासातल्या स्मृतींना पुन:पुन्हा काळजावर कोरते ...
..आठवणी येत राहतात ...
आणि मी त्यात गुंतत जातो ...गुंततच जातो ...
..
तसं हे गुंतणं मनाला भावतं ...
तुझ्या स्मृतीमागे मन का धावतं,,
...
मनाला तेवढाच आधार वाटतो ...
तुझ्या विरहाचा का भार वाटतो?
..
मनाला उत्तर सापडत नाही ..
आठवणीना काही केल्या सोडत नाही...
No comments:
Post a Comment