Wednesday, November 9, 2011

एकच तुझा स्पर्श तो...

मैफिलीत तुझे नाव कोणी घेत तेव्हा
साऱ्यांची नजर माझ्यावर असते
जणू तुझ्या गाण्याची सुरुवात म्हणजे
माझी "प्रेतयात्रा" असते ...................


मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं
तुला शंभर वर्ष आयुष्य आहे
मरणही चाट पडून म्हणालं
काय हा मनुष्य आहे ?



प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटल तर भरारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरट असावं
संद्याकाळी परतण्यासाठी ................



मी एक तो क्षण....
तुझ्या सवे असलेला...
तुझ्या एक हास्य मागे...
तुला हृदय देऊन बसलेला...



एकच तुझा स्पर्श तो...
अजूनही तळहातावर जपलेला...
नाही कळले तुला कधी...
पण मी त्यालाही आपला मानलेला...



देशील का ग पुन्हा....
विश्वासाने हात माझ्या हातात...
राहशील का ग पुन्हा..
त्यात प्रेमाने माझ्या हृदयात....


amol ghayal

No comments:

Post a Comment