Monday, November 7, 2011

"पिंपळ"

"पिंपळ"

उभा आजही तो
त्याच वाटेवर भिल्ला सारखा
माझ्या कुमार वयातला माझा सोबती
"पिंपळ"
पहिल्या चार ओळी
त्याच्याच कुशीत,त्याच्यावरच लिहिल्या
आणि पहिली दाद सुद्धा त्याचीच
प्रत्येक पान त्याच हलणारं,एक एक शब्द जणू माझा
आणि तो म्हणजे अभिप्रायाच माझ्यासाठी

जीर्ण झालेला एक पान त्याचं
त्या चार ओळींवर निजवल होतं
आजही ते तिथेच गाढ झोपित आहे
मला आठवणीत जागं ठेवून

आज गाव सोडून बरीच वर्ष झाली
माझ विश्व बदललं
माझा जगणं बदललं
आणि तेव्हडाच मी हि बदललो

इथे माझा पिंपळ नाही आज
त्याच्या पानांचा सळ सळ आवाज नाही
आहे ते वाहनांचे कर्ण कर्कश आवाज टोचणारे
त्याच्या फांद्यांमधून झिरपणारा सूर्य
इथल्या म्हाडाच्या उंच उंच इमारतींच्या झाडात
गुडूप होयील... दिसेनासा होयील....नक्कीच

आज बंधिस्त झालोय मी
आणि माझ्या त्या चार ओळी इथे
पण आठवणीत तू मात्र
रोज बहरत असतो
मी तुझ्या माझ्या चार ओळी घेवून
या शहरात "पिंपळा" सारखा वावरत असतो

तुला समर्पित याच त्या चार ओळी ....
"माझ्या वहीच्या पानावर,तुझ एक पान
मी शब्द कवटाळून,शोधतोय तुझ्या मनाचा तळ
तू हिरवागच्च, डौलदार,सावली अन्थरणारा
मी चार ओळींच्या फांद्यांनी ,उभारतोय माझा "पिंपळ"

No comments:

Post a Comment