आज तिला नक्कीच,
कसलंतरी दुःख होत!
तिने जरी लपवलं असलं,
तरी मला मात्र स्पष्ट दिसलं!
केव्हा जाईल तिच्या आयुष्यातील,
हा वेदनांचा प्रहर!
केव्हा येईल तिच्या आयुष्यात,
आनंदाची लहर!
नेहमीच प्रेमाने इतरांना,
भरभरून देणारी परी!
स्वःता मात्र शेवटपर्यंत,
राहिली अधुरी अधुरी!
तिच्या स्वप्नातील तो राजकुमार,
कधी तरी येईल का?
सुखांच्या क्षणांच्या,
ठेवा तिला देवून जाईल का?
ती वेडी घायाळ हरिणी,
धुंद होवून त्याची वाट पाहते!
दिवस-रात्र त्याच्या स्मृतीत,
क्षणा-क्षणाला मरत असते!
तिच्या मनातील वेदना,
ह्या मला घायाळ करून जातात!
कारण तिच्यावरील प्रेमाचा,
एक नजराणा देवून जातात.
No comments:
Post a Comment