Wednesday, December 7, 2011

तुझ्या शरीराला... केवड्याच्या...गंध...

तुला लपून पाहण्यात ...
एक वेगळीच मजा असते...
तू मागे वळून पाहताच....
तुझा कटाक्ष जीवघेणी सजा असते.



तुझ्या प्रत्येक आरोपाला...
मी आहे कारणीभूत...
तू नाही म्हतलेस तरी...
माझ्या विरूद्ध प्रत्येक सबूत...





मृगजळाच्या या वाटेवर..
कितीतरी वाटसरू भेटले...
त्यांना मागे सारत...
मी हे मृगजळ गाठले...




अस्तित्व नसतानाही..
प्रत्येकाला मृगजळाची ओढ आहे..
कितीही फ़सवे असले तरी...
हे मृगजळ किती गोड आहे..




पापण्यात तुझ्या ...
मला पाहताच झालेली चुलबूल..
माझ्या पापण्यांना त्याची..
हळूच लागलेली चाहूल...




शब्दांना तुझ्या मी...
गुंफ़ले एका ओळीत...
बघ सखे कसे विसावले..
ते सारे या चारोळीत..



तुझ्या शरीराला...
केवड्याच्या...गंध...
तुटो ना कधीही..हे,
आपल्या नात्याचे रेशमी बंध.

No comments:

Post a Comment