Monday, December 5, 2011

आता माझ्या डोळ्यानी..

पाठीला पाठ लावून बसलो ..
तरी समोर तूच दिसतेस....
मागे वळून नजर भेट होताच....
लाजून गालात हसतेस...




समोर तुला पाहताच...
लवतो डावा डोळा....
हसून तू पुढे गेलीस...
कि हृदयात येतो आनंदाचा गोळा...



आता माझ्या डोळ्यानी..
तुझी वाट पाहणे सोडले आहे...
जेव्हा पासून त्यांचे नाते..
तुझ्या आठवणींशी मी जोडले आहे




अडगलीतल्या वहीत....
आज तुझी तस्वीर सापडली....
तिला पाहून मनात पुन्हा..
तुला भेटण्याची आशा जागी झाली...

No comments:

Post a Comment