एकदा तुला भेटायचे आहे....
मांडीवरतुझ्या झोपायचे आहे...
खांद्यावर डोके ठेवून तुला...
पुन्हा पुन्हा निहारायचे आहे..
संध्याकाळचा संधी प्रकाशात.....
फुलून जातेस तू साजणे ....
तो रवी देखील विसरून जातो मग....
अस्ताला जायचे, पाहून तुझे गोड लाजणे....
चढली हि माझ्यावर ..
तुझ्या ओठांची नशा....
स्पर्श होता त्यांचा...
भुलवी माझी दिशा...
अळवावरच्या थेंबाला...
ओढ ही कुठली...
अळवाच्या पानावरचं...
त्याची जिवन शैली मिटली.
तुझ्या डोळ्यात मला...
माझचं प्रतिबिंब दिसतं...
तु मला पाहत असताना..
माझं मन ही तुझ्यात फ़सतं
तुला पाहते रे मी...
डोळ्यांचे पारणे फ़िटे पर्यंत...
डोळ्यात तुझं प्रतिबिंब साठवेन...
डोळ्यात प्राण असे पर्यंत...
No comments:
Post a Comment