तू बोलत असलीस कि..
नुसतेच तुला पाहत असतो.....
तुझ्या प्रत्येक शब्दाला....
माझ्या कवितेसाठी चाळत असतो...
चेहरया वरचा पदर जेव्हा..
हातुन तुझ्या सरकतो....
आकाशातील चंद्र देखील..
त्याचे प्रतिबिंब पाहून फ़सतो..
तुझ्या साठी जगायचे आहे....
तुला स्वप्नात जागवायचे आहे...
डोळे मिटता समोर तूच दिसावीस....
असेच काहीसे स्वप्न रोज पहायचे आहे...
रंग मी चढवला....
तुझ्या प्रेमाचा अंगावरी...
दूर असूनही तू, नाव तुझे....
सतत येते ओठावरी...
तुझ्या सौंदर्याने माझ्या ...
दाही दिशा सजलेल्या..
तुझ्याच स्वप्नात मी माझ्या...
साऱ्या रात्री जगलेल्या...
पोहचू दिलेच नाही कधी तुझ्या पर्यंत...
जे लपलय माझ्या शब्दात...
कसे सांगू गं तुलां मी....
अजुन ही जपतोय तुला स्वप्नात..
No comments:
Post a Comment