Monday, December 5, 2011

खोको खोको च्या खेळात...

खोटा तुझा तो नकार....
नाकावर लटका राग....
हृदय जळतेय माझ्या साठी...
अन मनाचाही त्यात सहभाग..



तुझा माझा खेळ ..
खेळ तो भातुकलीचा....
मोठे होता होता...
मेल जुळे ना कुणाचा..




खोको खोको च्या खेळात...
तुझा नेहमीच मला असे खो...
मला वाटे तू सांगतेस...
तू फक्त माझाच हो...

No comments:

Post a Comment