Wednesday, December 7, 2011

गालावरून तुझ्या तो.. घसरलेला मी एक थेंब...

आज तुझ्या आठवणींनी...
पुन्हा हैराण केले...
जाता जाता त्यांच्या सोबत...
मलाच वाहून नेले...


आज तुझ्या सोबत मला...
तो समुद्र किनारा पार करायचाय...
वाळूवरून तुझ्या संगे....
दोन पावले चालायचय...




हातात तुझा हात घेता...
हृदयात होते धडधड...
सौंदर्य तुझे पाहायला....
बिचाऱ्या डोळ्यांची गडबड...



मिठीत माझ्या विसावलेली...
तुझ्या डोळ्यांची दोन पाखरे....
पापण्यांनी बोलतात काही...
तुझ्यातच माझे सुख रे....




तू मला पाहत गेलीस...
अन मी सुख शोधात होतो तुझ्यात....
तू खुदकन हसलीस अन...
आयुष्यभराचे सुख लाभले त्या क्षणात ...



हातावरच्या रेषा तुझ्या..
नागमोडी पसरलेल्या...
तुझ्या कडून माझ्या पर्यंत...
हृदयाच्या आकारात वळलेल्या...



गालावरून तुझ्या तो..
घसरलेला मी एक थेंब...
हृदयावर येताच तुझ्या...
विसावलेला मी एक थेंब...

No comments:

Post a Comment