मऊ मऊ चादरीत...
झोप माझी पळून जाई..
झोप मला शांत लागे..
तुझ्या मिठीतच गं आई..
दिवस सरता सरता....
तूझ्या आठवणी दाटून येतात...
तू कितीही नकार दिलास तरी....
त्या तुझ्या नकळत मला भेटून जातात...
दिशा बदलून जाते हवा....
तू येण्याचा भास होताच...
मी पण बहरून जातो....
तुझी चाहूल लागताच...
नकार तुझ्या ओठांवर...
मनात मात्र होकार....
हृदयाच्या बंद पाकळीत....
कधीच केला मी तुझा स्वीकार..
No comments:
Post a Comment