मला तुला साँरी म्हणायचं होतं
माझ्यावर तुझं निरागसपणे प्रेम करणं
अन तुझ्यावर माझं उगाचच वैतागणं
हर एक रुसल्या क्षणाला तुझ्या खुलवायचं होतं..
मला तुला साँरी म्हणायचं होतं...
मी गेलो तेव्हा पाऊस थांबला असेल
तुझ्या मनात वेदनांचा पूर दाटला असेल
गहिवरल्या तुझ्या त्या मनाचा किनारा व्हायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...
गर्दित असताना हुंदके टाळले असतील,
आठवणींत माझ्या तू टिपंही गाळली असतील
तुझ्या हुंदक्यांचा मला आधार व्हायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...
तुझी हासवं आठवतात,
तुझी आसवंही आठवतात
हासवांना जपत तुझ्या आसवांना टीपायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...
जाणतो मी..
आभाळभर मनात तुझ्या मीच उरलेलो,
तरिही पुन्हा मला ’माफ़ केलं..!’ असं ऐकायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...
amol.ghayal123@yahoo.co.in
No comments:
Post a Comment