Thursday, December 22, 2011

अबोल तुझ्या शब्दातले

अबोल तुझ्या शब्दातले
बोल तो बोलून गेला
निरागस तुझ्या डोळ्यातली
आसवे तो पुसून गेला

तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
उमटवूनी तो निघून गेला
ओठांवरचे नाजूक काहीतरी
नकळत तो खूलवून गेला


कोपर्‍यात हृदयाच्या
प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
पसरवूनी तो निघून गेला

दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
मैत्रीत तो जगून गेला
सतत तुझी काळजी करणारा
तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला.........................!!!

No comments:

Post a Comment