Tuesday, November 1, 2011

तीने करायचं miss तुम्ही करायचा call

तीने करायचं miss

तुम्ही करायचा call

तुम्ही धरायच्या पिशव्या

ती भटकणार mall

तुम्ही black ने काढलेली tickets

आणि ती म्हणणार...movie flop

तीचा ढगळ्, ओंगळ् झगा...

तरि तुम्ही म्हणायचं cute top

सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?

बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !

तुम्ही दोघांनीही करायचं प्रेम,

पण फक्त तुम्हीच लिहायचं letter

नेहमी तुम्हीच म्हणायचं sorry

आणि ती म्हणणार thats better

तीला आवडणारं रटाळ re-mix

तुमच्या डोक्याला होणार त्रास

नेमका तीलाच कसा येतो हो...

तुम्च्या shirt ला cigarette चा वास

सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?

बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !

तुम्ही आलं घालुन केलेला चहा सुद्धा,

तीला लागावा फिका...

आणि अमकी अमकीचा नवरा बघा...

सगळ स्वयंपाक करतो...........काहीतरी शिका

तुम्हीच घ्यायचा मुलांचा अभ्यास,

आणि ती पहाणार T.V.

तुमचा उद्धार झालाच म्हणून समजा...

जर घातलीत च्कून एखादी शिवी

सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?

बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !

जर party मध्ये थोडिशी घेतलीत...

तर ती म्हणणार...आलात ढोसून ?

तुमची उतरेपर्यंत आणि उतरल्यावर सुद्धा..

कटकट करणार तुमच्या डोक्याशी बसून

तुमच्या आवडीचे...light orange colour चे पडदे,

ती म्हणणार..हे काय भगवं घातलय ?

bathroom चा नळ गळतोय तो बघा...

वर बघा जळमट लटकलय

सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?

बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !

मला जाणवतय अत्ता

तुम्हाला नेमकं कसं वटतय...

असं वटतय की तीचं प्रेम

कुठे तरी आटतय,

हे असं वटत असतानाच,

कदचित छातीत तुमच्या कळ येईल...

क्षणात तीचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी..

सगळं सगळं उतू जाईल

तीची तगमग, धावपळ, तळमळ पाहून

तुम्हाला वाटेल धन्य,

संसाराच्या जमा खर्चात,

प्रेम जमा....भांडण शून्य

हेच fair हेच lovely , सांगा दोस्त हो वाटतय ना बरं...

तीच्या नजरेत नजर मिसळून सांगा, हेच आहे ना खरं !

No comments:

Post a Comment