पाठीवरी वहाण्या ओझे चिकार आहे,
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे..!ㅤ
ㅤ
माझाच मी करावा का पाठलाग येथे ?
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे..!
ㅤ
चाले लपाछपीचा हा खेळ जीवनाशी
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे..!
ㅤ
कोणा सवंगड्याची चाहूल हूल देई,
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे..!
ㅤ
कानात कापसाने जाणीव संपते का ?
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे..!
ㅤ
कॉफी पिऊन झाली, साका तळी सुकावा,
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे..!
No comments:
Post a Comment