Tuesday, November 1, 2011

कवितेस आज होश आला

कधी माझ्या डोळ्याने हि
तू बघ स्वतःस
तू हि हरवशील
स्वतःच्याच प्रेमात


रानफुलच जीवन
का असे अपरिहास
ना सुवास त्यास सख्ये
सोंदर्य हि केवळ भास



श्वेतअंबरी नभी चे
सारे कयास विफल ठरले
रविस स्वतः आड घेणारे
तुजे सोंदर्य लपिवणारे ... आज मागे पडले



कवितेस आज होश आला
माझा विरह बेडर झाला
मांडुनी ते शब्दात सारे
माझ्या ओळीने तो दोष केला



अवचित येतो ... गालावर
चपराक खेचून जातो
म्हणे ... ती इथे कविता करतो
मी मात्र ते वाचून माझे हे मन जाळतो

No comments:

Post a Comment