Tuesday, November 1, 2011

देवाचे दर्शन देवळातच का घ्यायचे..?

देवाचे दर्शन
देवळातच का घ्यायचे..?
वाटेल तेव्हा त्याला
आपल्या मनात भेटायचे..
देवळातले वातावरणात
बरे वाटते जरी
दगडाची मूर्ती पाहून
पाजार फुटत नाही उरी...
मी तर त्याच्याशी
मनातल्या मनात गप्पा मारतो
भाविकांच्या रागेत न राहता
मनातच देऊळ उभं करतो...
तो येतो आणि वास करतो
मी मनोमन त्याला पुजतो
मी देवळाच्या पायरीवर
आणि देव माझ्या मनात असतो...

No comments:

Post a Comment