Tuesday, November 1, 2011

माझ्या कवितेच्या प्रत्येक शब्दास तुझी आस आहे

तो म्हणाला
विसर तिला आता
मी म्हणालो
कडेलोट कर माझा जाता जाता....



कधी कधी तुझ्या कवितेचे
कोडेच मला सुटत नाही
शब्द सारे कळतात पण
भावना मात्र गोंधळवतात



तेजाळलेले रूप तुझे
जैसे सुवर्णकषी
भाव अपुरे पडतात
त्यात शब्द माझे मितभाषी




मी तिला एवढेच म्हणीन
मला जगू दे
प्रेमावाचून स्वर्ग
डोळे मिटल्यावर बघू दे.


ह्या भावना का असे
भलतेच लाडावलेले
तू किती नाही म्हणताना
तुझ्याच मागे फिरणारे


माझ्या कवितेच्या प्रत्येक
शब्दास तुझी आस आहे
तुझे सोंदर्य टिपण्यात
त्यांची खास बात आहे

No comments:

Post a Comment