देह हा निपचित पडलेला
तिच्या भेटीस अवचित हरवलेला
तिने मात्र अंतयात्रा समजून
असाच दुर्लक्षित केलेला
तेच भाव तेच शब्द
सांग किती वेळा मांडू
सुकलेल्या ह्या नयनातून
सांग किती आसव सांडू
देहाने हि साथ सोडावी
का मृत्यू ने अशी बेफिकिरी करावी
जन्मांतरीचे नाते हि सारे
अर्ध्यातच का मोडावी
का ग अशी लाजतेस....
मी सोबत असताना....
मनमुराद बागडताना पाहिलंय मी तुला....
तुझ्या मैत्रिणीं सोबत असताना...
आत्मा हा निरंतर
देह हा क्षणातर
तेच जाणते सख्ये
कापीत जाने जन्म मृत्यू अंतर
शब्द माझे गाळून असाव
जिची आठव आठवतात
तीच येवून मज विचारी .. सख्ये
हे शब्द कोणासाठी रडतात
शब्द माझे गाळून असाव
जिची आठव आठवतात
तीच येवून मज विचारी .. सख्ये
हे शब्द कोणासाठी रडतात
No comments:
Post a Comment