तुझ्या हृदयाचे माझ्या हृदयाशी...
बंधन असे हे एक अनोखे....
तु कितिही दुर असलीस तरी...
तुझ्याच आठवणीत हृदय धडधडते सारखे..
तुझं माझं मन,केवड्याचं बन
वाराही थांबतो ,घ्याया त्याचा गंध!
तुझी माझी झोप ,स्वप्नांची खोप
त्यात बघ पडतो ,प्रेमाचा झोत!
तुझी माझी भेट ,आठवणींची पेठ
चल आपण घेऊ ,'सरींचा सेट '!
तुझं माझं नातं ,ऋतूंच जातं
फिरून पुन्हा रोज , नवंच वाटतं!
तुझी माझी साथ ,जणू साखरभात
गोडी त्याची राहो,काळजाच्या आत !
No comments:
Post a Comment