चंद्र ..........
चंद्र तुझा माझा सारखाच
रोज रात्रीला नटणारा
चादण्याच्या शृंगाराला जळणारा
अंधराच्या ओठांमध्ये प्रकाश शब्द बोलणारा
चंद्र तोच... आकाशाच्या घरात
रोज दिवाळी साजरी करणारा
पौर्णिमेत खुलणारा..
दिट लागू नये म्हणून काजळ लावून
अमावषेत अंग चोरणारा....
चंद्र तुझा माझा सारखाच...
................
........................ढगांच्या चादरीत निजणारा
No comments:
Post a Comment