Wednesday, November 2, 2011

इच्छा... !!!

इच्छा... !!!

एकच इच्छा असायची
सोबत तुझ्या फिरायची
न मिले कधी वेळ तुला
ती मनी तशीच उरायची

कशी बशी मी
मनाची समजूत काढायची
सवय होती इच्छेला
मनातल्या मनात रडायची

भेटीसाठी तुझ्या
इच्छा मनी झुरायची
दुखावलेल्या इच्छेत शेवटी
पापणी मात्र भिजायची

वाटेवर डोळे अन
हृदयी आस तुझ्या येण्याची
तू न आलास भेटीस माझ्या
इच्छा मनातच मरायची

मेलेल्या इच्छेत आता
आस न उरली कशाची
मन हि आता थकले
वाट पाही पापणी मिटण्याची

No comments:

Post a Comment