Tuesday, November 1, 2011

देवळाच्या पायरीवर शांत बसून होतो

देवळाच्या पायरीवर
शांत बसून होतो
भाविकांची रेलचेल
हसून टिपत होतो
भक्ती भाव दाटून आला
सावळा गोंधळ सुरु
मला प्रश्न पडला
आत जाऊन मी काय करू?
मला कधीच नाही भासली
गरज आत जाण्याची
हमी त्याने दिली होती
माझ्या मनात असण्याची...

No comments:

Post a Comment