Sunday, February 19, 2012

अंधारल्या चारीही दिश्या

अंधारल्या चारीही दिश्या

आज रात्र ही वेगळी का ? वाटते

आकाष्यात चंद्राची चाहूल , आज वेगळी का भासते || धृ ||



मनी काहूर का माजले , मला असे काय होते

कुणाच्या भेटीची मनी ओढ का ? लागते |


बेभान सुटला हा वारा , मला तो न दिसे

स्पर्श होता मला त्याचा, आज स्पर्श वेगळा का भासे

मोहरली ही काया, आज अंग का गार पडले

मला आज असे काय होते |



आज मी एकटी एकटी , कुणाचीही साथ नसे

पाहता मागे मला माझीच सावली न दिसे

अस्तित्व माझे हे अंधारात दुबलेले

मला आज असे काय होते |



बंद खोलीतून आज मी , नभ हे पहिले

पाहूणी हा पलंग खाली, आज घर सुने वाटते

पदस्पर्श होता माझा जमनिला,

मला कुणाची उणीव का ? भासते

मला आज असे काय होते |

No comments:

Post a Comment