इच्छा" या शब्दाची व्याख्या तशी कठीण नाही…..
प्रत्तेक इच्छेत काही न काही हवंच असतं…कधी पैसा,कधी प्रेम,कधी प्रसिद्धी तर कधी माणसं.
जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत साथ देणारी गोष्ट म्हणजे "इच्छा"….
आणि
"स्वप्न" म्हणजे इच्छेचे प्रतिबिंब….
… … काहीजण म्हणतात,"आता काही इच्छा नाहीत,इतके वाईट झाल्यावर सर्व इच्छा मेल्या आता"…
पण
"आता मनात कोणतीही इच्छा येऊ नये" हि पण एक इच्छाच असते"..हि गोष्ट आपण विसरतो.
काही इच्छा पूर्ण नाही झाल्या कि,मनात आग लागते….
आणि सगळ्याच आगी अश्रूंनी विझवता येण्यासारख्या नसतात….त्या सतत धगधगत राहतात…
"काही माणसं आधीच जळलेली असतात…स्मशानात आग देहाला लावली जाते"
No comments:
Post a Comment