आहात तुम्ही सावरायला म्हणुन
पडायला आवडते…
आहात तुम्ही हसवायला म्हणुन
रडायला आवडते…
आहात तुम्ही समजवायला म्हणुन रूसायला आवडते…
… … … आहात तुम्ही सांगायला म्हणून
कुठेतरी चुकायला आवडते…
आहात तुम्ही पहायला म्हणून
काहीतरी करायला आवडते…
आहात तुम्ही शोधायला म्हणून
कुठेतरी निघुन जायला बरे वाटते…
आहात तुम्ही काळजी घ्यायला म्हणून
आजारी पडायला बरे वाटते…
माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे मित्र म्हणुन मला जगायला आवडते…!!!
No comments:
Post a Comment