Sunday, February 19, 2012

मिळेल का अशी ? , जी माझ्या कविता वाचणारी असेल....

मिळेल का अशी ? ,
जी माझ्या कविता वाचणारी असेल....
जमत नसलं तरीही,
माझ्यावर कविता करणारी असेल...

मिळेल का अशी ? , ,
जी माझ्यासाठी, काहीही करणारी असेल...
मी येतोय हे कळताच,
फक्त माझीच वाट पाहणारी असेल....

मिळेल का अशी ? ,
जी अप्सरे सारखी दिसणारी असेल ...
मी नाही तिझ्या इतका सुंदर,
तरीही माझ्यावरच प्रेम करणारी असेल ....

मिळेल का अशी?
जी मला पाहून गोड हसणारी असेल,
अन उशीर झाला येयला म्हणून,
लहान मुली सारखी रुसणारी असेल...

मिळेल का अशी ? ,
जी फुलेल्या कळी सारखी असेल....
पाहू लागली माझ्या कडे,
कि तिच्या नयनात, मला सारे जग दिसेल...

मिळेल का अशी?
जी लोकान समोर अबोल असेल,
पण मी भेटल्यावर,
non-stop बोलणारी असेल...

मिळेल का अशी?
जी माझ मन वाचणारी असेल,
मी न बोलताच,
सगळ काही समजनारी असेल...


मिळेल का अशी?
जी काही हि झालं,
ते फक्त मलाच सांगणारी असेल ,
रडू आल तरीही फक्त माझ्या जवळच रडणारी असेल...

मिळेल का अशी ? ,
जिच्या साठी मी तिचा राजा,
अन ती माझी राणी असेल...
मी बरोबर असताना,
कधी हि तिझ्या डोळ्यात पाणी नसेल....

No comments:

Post a Comment