Designer कपडयांच्या ढिगाऱ्यात,
१३ जून च्या स्कूल युनिफोर्मचा वास हरवला .
बासमतीच्या मंद घमघमाटात ,
... रेशनच्या भाताचा सुवास हरवला .
Dark Fantasy च्या जमान्यात
,
Parle च्या sharing चा आनंद हरवला.
Dairy मिल्क भपकारयात,
लिमलेटच्या गोळ्यांचा छंद हरवला.
सुट्ट्यांच्या दुष्काळात,
मामाचा गाव हरवला.
Kelloggs च्या ब्रेकफास्ट मागे लागून,
नाश्त्याचा चहा अन पाव हरवला .
नात्यांच्या सुपर मार्केटमध्ये,
आपुलकीचा सहवास हरवला.
नाण्यांच्या खूळखूळाटात,
माणसांचा आवाज हरवला ...
No comments:
Post a Comment