Friday, February 24, 2012

मी असाच आहे,एकटा एकटा जगणारा...

मी असाच आहे,एकटा एकटा जगणारा....
सर्वात असाताना देखील,स्वतःहाच्या शोधात फिरणारा.....
मी असाच आहे,खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,कुणालाही सहज आपलसं करणारा......
मी असाच आहे,जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,आपला धर्म मानाणारा.....
मी असाच आहे,दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसत हसतानियतीला लाजवणारा....
मी असाच आहे,इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतःहा मात्र,काळोखात आठणारा.....
मी असाच आहे,सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनातघर एक करुन राहणारा........

Sunday, February 19, 2012

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय
करणार आहेस?

मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन,
लग्न करीन. आणखी काय करणार..??

बाबा :बेटा योजना चांगल्या आहेत..
फक्त जे काही करशील ते
योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं...!!!

एक विनंती आहे....

एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर
वेळच देऊ नका.....
... ... एक विनंती आहे.....
साथ सोडुन जायचचं असेल तर
हाथ पुढे करुच नका .....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल तर
मनात आधी भरुच नका.....
एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms
यांचा
कटांळाच येणैर असेल तर
कोणाला नंबर
देऊ नका,....
Memory full झालिये सांगून
delet च करायचा असेल तर
नंबर save च करु नका.
एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच नसतील
तर
मनाचं दार उघडूच नको.......
एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच
होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं असेल
तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........
एक विनंती आहे......
अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर.....
आधी डाव मांडूच नको...
रागावून निघून जायचचं असेल
तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....
एक विनंती आहे.....
सवयीच होईल म्हणून तोडायच असेल
तर...
र्कपया नातं जोडून नका
फाडून फेकून द्यायचं असेल तर....
माझ्या मनाचं पान उलगडूच नको.. ♥♥♥

एकदा ती माझ्याकडे आली

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत

सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

येशील सांजवेळी

.....येशील सांजवेळी
साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

जीवनातली नाती........

जीवनातली नाती........

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

हे अगदी खंरच आहे

आयुष्यात प्रेम करायचय मला ..

आयुष्यात प्रेम करायचय मला ...
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला..!!!!!

मिळेल का अशी ? , जी माझ्या कविता वाचणारी असेल....

मिळेल का अशी ? ,
जी माझ्या कविता वाचणारी असेल....
जमत नसलं तरीही,
माझ्यावर कविता करणारी असेल...

मिळेल का अशी ? , ,
जी माझ्यासाठी, काहीही करणारी असेल...
मी येतोय हे कळताच,
फक्त माझीच वाट पाहणारी असेल....

मिळेल का अशी ? ,
जी अप्सरे सारखी दिसणारी असेल ...
मी नाही तिझ्या इतका सुंदर,
तरीही माझ्यावरच प्रेम करणारी असेल ....

मिळेल का अशी?
जी मला पाहून गोड हसणारी असेल,
अन उशीर झाला येयला म्हणून,
लहान मुली सारखी रुसणारी असेल...

मिळेल का अशी ? ,
जी फुलेल्या कळी सारखी असेल....
पाहू लागली माझ्या कडे,
कि तिच्या नयनात, मला सारे जग दिसेल...

मिळेल का अशी?
जी लोकान समोर अबोल असेल,
पण मी भेटल्यावर,
non-stop बोलणारी असेल...

मिळेल का अशी?
जी माझ मन वाचणारी असेल,
मी न बोलताच,
सगळ काही समजनारी असेल...


मिळेल का अशी?
जी काही हि झालं,
ते फक्त मलाच सांगणारी असेल ,
रडू आल तरीही फक्त माझ्या जवळच रडणारी असेल...

मिळेल का अशी ? ,
जिच्या साठी मी तिचा राजा,
अन ती माझी राणी असेल...
मी बरोबर असताना,
कधी हि तिझ्या डोळ्यात पाणी नसेल....

मुंबई मुंबई मुंबई ……………

मुंबई मुंबई मुंबई ……………

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय
८ रूपयाला वडापाव आणि १० रु ला चाय
आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय
…आणायची ९० रु किलोची चिकन सांगायच बोकडाच मिळतच नाय
अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय ………..

सकाली सकाली ९ वाजता उठायच
बिना तोंड धुता खिडकित यायच
शेजारच्या पोरीला शाळेत जाताना
हळूच म्हणायच हाय
तीने रागात पाहिल तर
म्हनायच सुंदर माझी ताय
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच रोंग़ नंबर लागला की काय
अहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय

रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्त
बाइक वाल्यांची किर किर
फेरीवाल्यांची दादागिरी
सड्लेली कोथिम्बिर
कच्च कुच्च वडापाव
आणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन
पर प्रान्तियानाच म्हनाय्च भाय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय

पान्या साठी पलायच , ग्याससाठी रांगा
कामाला जान्या अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आत मधे
आणि बाहेरच लटकतात पाय
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय

काही ही असुद्यात
पण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती
तीच आमची ताय आणि तीच आमची माय
आमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय
आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय
गरिबाच पोट आणि दुधावरली साय

नाव माझे मी

नाव माझे मी
तुझ्या मेहंदीत पहिले
i love you म्हणायचे होते मला
पण म्हणायचेच राहिले ..

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..

प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..

सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता ..
... ...
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते ..

दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..

चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते ..

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..

"अनुभव " म्हणजे काय हे तेव्हाच कळते ...!!

जेव्हा एखादी "ठेच " काळजाला लागते ....! "

ताई म्हणजे ताई असते

किती हि गुंतवून ठेवलं
किती समजावलं मी मनाला
पण सखे तुझीच आठवण
मज येते प्रत्येक क्षणाला



ताई म्हणजे ताई असते
जगा वेगळी ताई असते.....

तिची हाक़ म्हणजे
मन हराव्नरी असते......
तिची प्रेमळ बोली
मनाला जिंकणारी असते.....

ताई म्हणजे ताई असते
जगा वेगळी ताई असते.....
घरातली तुळस तिच्या
मायेने वाढत असते....
बगिच्यातला निशिगंधा....
तिच्या हसण्याने फुलत असते....

ताई म्हणजे ताई असते
जगा वेगळी ताई असते.....

तिच्या सुरांवर
घर रमत असते.......
तिच्या तालवार
घर चालत असते...

ताई म्हणजे ताई असते
जगा वेगळी ताई असते.....

आपल्या लहान भावाचे आश्रू पुसयला
ती सतत तयार असते....

ताई म्हणजे ताई असते..
जगा वेगळी ताई असते....!!!

प्रेम .....मराठीतील एक शब्द .

प्रेम .....मराठीतील एक शब्द ...पण
किती महत्व आहे ना या शब्दाला .....!
प्रत्येकाला प्रेम करायचं आहे , त्याला जवळ
बोलावयाचय ....त्याच्या
कुशीत डोक ठेऊन शांतपणे झोपी जावस
... वाटत....अशा किती तरी भावना आपल्या
मनात निर्माण होतात ....
मग निसर्ग नियमाने माणूस प्रेमात
पडतोही ....
काहींना प्रेमाचं सुख मिळत तर
काहींना प्रेमभंगाचा चटका .....
मुलांना वाटत मुली वाईट असतात तर
मुलीकुठल्याही मुलावर विश्वास
ठेवायला तयार नसतात .....
खर तर मित्रांनो ....
मुलांचं प्रेम हे काल्पनिक असत तर मुलींचं
वस्तूस्थितीवर आधारित .....
आणि दोघेही बरोबर असतात ...प्रश्न
येतोसामोपचाराचा ...पण ते होत नाही..
प्रत्येकाला आपला ' स्व ' अन " भविष्य
"महत्वाच वाटत ...अन मग
त्यामुळे कुठेतरी या गोष्टींचा भडका उडतोच
अन मग प्रेमाची वाट लागते .......
...प्रेम अन प्रेमभंग ही एकाच रथाची दोन चाके
आहेत..... एक चाक उचलून
हाताला काहीही लागत
नाही.....प्रेमभंगाच ा चटका मात्र सतत
भेटतो....
याचा विचार करा .....
आणि
" एकांती डोहात बुडणे हा प्रेमरोगावरील
रामबाण उपाय कधीच होऊ शकत नाही ".....

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो I
समजत नाही मी घडलो की बिघडलो II
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो I
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो II
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो I
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो II
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो I
धन जमा करताना समाधान विसरलो II
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो I
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो II
टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्‍यामुळे चागलं निवडणं विसरलो II
गाडी आल्यापासून चालणं विसरलो I
मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो II
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो I
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो II
संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो I
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो II
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो I
परफ्युमच्या वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो II
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो I
जगाच्या भूगोलात गावाचा इतिहास विसरलो II
बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो I
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो II
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो I
स्वतःमध्ये मग्न राहून दुसर्‍याचा विचार विसरलो II
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो I
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो

कवीता म्हणजे .....

कवीता म्हणजे ......
मनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब
अवचीत मिळणारा एखादा भावक्षण
स्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण
भावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन

जे कवीता करतात
ते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात
कधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात
मनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात कवीता असतात,नाजुक फुलासारख्या ,
फुलल्या की आनंद देणारया
सुंदर दवबिंदुंसारख्या
मनाला सहजच भावणारया ,

कवीता विचार करायला लावतात
काही थोडेफार रडायलाही लावतात
काही मने जूळवतात
काही नाती बनवतात
काही भावना व्यक्त करतात
काही रोष व्यक्त करतात
समाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात

कवीता शब्दांपासुन सुरु होतात
व शब्दांवरतीच संपतात
पण
संपता संपता ते
आयुष्याला एक ध्येय देऊन जातात
भावनांचे रंग मनावर असे चढतात की
ते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात
म्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात.

तुझ्याशी मैत्री म्हणजे वेगळीच बात आहे ...

तुझ्याशी मैत्री म्हणजे
वेगळीच बात आहे ...
कारण,, सुख आणि दुखात
आपल्या दोघांची साथ आहे .......


मत दूर जाना हम से कभी इतना
के वक़्त आनेपर अफ्सोसे हो ,
क्या पता फिर कभी तुम लोट के आओ
और ये जिस्म मिटटी मैं "खामोश " हो .....




कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेवतुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला




नफरत मैंने पैदा की
आज उसके सिने में

ना जाने तो बेहतर होगा वो
दर्द क्या होता है
उसके बगैर जीने में .


jina padega ab usake bagair use jo chhoda hai
dard bahut hoga sine me usebhi ab sahna hai

एक होता चिमना आणि एक होती चिमणी

एक होता चिमना आणि एक होती चिमणी
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार
तरीही एकमेकांचे जिवलग यार.

वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .

चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित,
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत

रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना

एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले

त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते

का “नाही” ह्याची बरीच कारणे सांगितली
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात नाही पटली

चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना

चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला

चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता

चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले

एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते

एक प्रश्न मात्र तिला आयुष्यभर सतावत राहिला
चिमण्याच्या डोळ्यात तिला दिसलेले प्रेम हा नुसता "आभास" कसा ठरला?

असा कुठला क्षण नाही,

असा कुठला क्षण नाही,
तुझी आठवण येत नाही,
अशी कुठली आठवण नाही,
ज्यात तु येत नाही.
कुठला गैरसमज करुन घेतेस,
... का एवढी विरहात रह्तेस,
आजकल स्वप्नांमधे पण
तुच असतेस.
मला ठउक आहे,
रात्री झोपण्याचा तु प्रयत्‍न
करतेस,
अंगावर गोधडी घेऊन
आठवणीत रडतेस.
जरी तु दूर असशील
मझयापसून,
तरीही नेहमी माझया
मनात असतेस.
कारण फक्त तुझी
आणि फक्त तुझी
आठवण असते.......

जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते .

जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते
.
.
तेव्हा मुलाला वाटत ते प्रेम आहे
.
... .
पण..?
.
.
ती मैत्री असते..
.
.
.
.
.
.

परंतु..?
.
.
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो तेव्हा मुलीला वाटते
.
.
ती मैत्री आहे पण ते प्रेम असते

"फक्त ते अबोल असते"
....(¯`v´¯)
..... •.¸.•´
...¸.•´
.. (
☻/
/▌
/ \

आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस

तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो ) पुढे ...

तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?

ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन .

तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस ,

खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम करतेस ?

ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते?

माझे तूझ्यावर प्रेम असते तर , तूला जायाला सांगीतले नसते

तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,

ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस

ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते,

तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येते

तो - मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस ?

सारखं मागे वळुन मला का पहातेस?

ती - मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटते

म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते

तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही ,

आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही

ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला,

पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज वेळ कसा वाया गेला?

तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून )

ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे

या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे

आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार

एक -दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणार

ह्या दिवसाचा एक =एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे

तूझं माझ्यावर प्रेम आहे का? या सर्वांना विचारायचं आहे

ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,

जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल

दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू लागतात . इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच असतो. खुप

राग आला असताना ही ती नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो.

ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...

ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे .

मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?

तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेस

मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं आहे .

(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो .. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो .. व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?

तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते ... व्हिल यू बी माय व्हेलेंटाई ♥ ♥ ♥

एकदा एका विमानतळावर एक मुलगी

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत
बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याचस्टोअरमधून
एक पुस्तकआणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास
होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन
पुस्तक वाचत बसली.
... तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले
होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट
खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन
खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून
तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!
माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे
चांगलंच सरळ केलं असतं!’ ती मनात विचार करत होती.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे
बिस्कीट उरले.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत:
खाईल,का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
ती विचार करत होती. “”आता हे अतिच झालं,” असे म्हणत
ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तकठेवायला तिने
पर्स उघडली. पाहते तर काय,
तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप
लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने
आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर
टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले
होते.
निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण
दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण
आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत
बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व
गोष्टींचा आढावा घेतलाय का?
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात
नसतात.

काळीज चीरलेस माझे

काळीज चीरलेस माझे
—————————
काळीज चीरलेस माझे,
शब्दांचे केलेस वार
आले डोळ्यात अश्रू ..
ना सोसावले मज वार

ओतुनी रक्त माझे..
तुजसाठी गायिले मी गीत ..
न कळली आज तुला..
माझ्या हृदयातली प्रीत..

एकाकी जीव माझा ..
त्या एकटीत गुंतला..
आज जणू विषारी काटा..
हृदयामध्ये खोल रुतला

सांडले रक्त ह्रदयी..
प्रेम शिलक्क राहिले
मात्र हृदय आज माझे
धडधडन्यास कायमचे विसरले

– फुलपाखरू

अंधारल्या चारीही दिश्या

अंधारल्या चारीही दिश्या

आज रात्र ही वेगळी का ? वाटते

आकाष्यात चंद्राची चाहूल , आज वेगळी का भासते || धृ ||



मनी काहूर का माजले , मला असे काय होते

कुणाच्या भेटीची मनी ओढ का ? लागते |


बेभान सुटला हा वारा , मला तो न दिसे

स्पर्श होता मला त्याचा, आज स्पर्श वेगळा का भासे

मोहरली ही काया, आज अंग का गार पडले

मला आज असे काय होते |



आज मी एकटी एकटी , कुणाचीही साथ नसे

पाहता मागे मला माझीच सावली न दिसे

अस्तित्व माझे हे अंधारात दुबलेले

मला आज असे काय होते |



बंद खोलीतून आज मी , नभ हे पहिले

पाहूणी हा पलंग खाली, आज घर सुने वाटते

पदस्पर्श होता माझा जमनिला,

मला कुणाची उणीव का ? भासते

मला आज असे काय होते |

जगण्यासाठी होती आस ...

जगण्यासाठी होती आस ...
म्हणून अश्रूंची मग धरतो कास
सांग तुझ्या या अधुर्या प्रीतीवर
कितीदा दाखऊ असा मूक विश्वास ...!!



नाही खेळायचे अग्नीबरोबर
ध्यानी - मनी ठरविले आहे...
प्रेम ही अग्नीपरीक्षा म्हणे
दिल्या शब्दानां जागायचं आहे

सौंदर्य तुझ आहे.. दाद द्यायला शब्द अपुरे...!

सौंदर्य तुझ आहे..
दाद द्यायला शब्द अपुरे...!!!

शब्द तर खूप आहेत..
रचना काय करू ? उमजत नाही
...
भावना मनात तर खूप..
व्यक्त कशा करू समजत नाही...!!!

किनारा तर जवळच आहे..
पार करू..खात्री नाही वाटत...!!!

परिचयाचे तर सारेच..
आपला कोण परका कोण ?
फरक करणे मुश्कील जात आहे...!!!

वाटते ना असावे कुणीतरी

वाटते ना असावे कुणीतरी
बावळटासारखे वागणारे
वेड्यासारखा वागेल पण
तेवढेच वेड्यासारखे प्रेम करणारे

वाटते ना असावे कुणीतरी
कितीही कामात असले तरी
एक क्षण आठवण काढणारे
जीव देणारे असतील
पण आपला जीव जपणारे
वाटते ना असावे कुणीतरी.

आयुष्य सरत चाललय

आयुष्य सरत चाललय

आयुष्यसरतचाललय
ओल्याजखमांघेऊन
अपमानाचदलदल
बदल्याचीभावनाघेऊन
तुझ्याचहातातआहे
अभिमानाचालगाम
सुकलेल्याखपल्या
उकरणकीवांफ़ुकंरघालून
सुकवण.
तुझ्याचहातातआहे……
अपमानचिघळतबसण
नेहमीचकठीणजात
तोगिळूनटाकावा…..
अनद्यावाढेकर,
निरागसतेचा…….
मीखरसांगू…..
तुझंमाझकाहीजातनाही
इथेहरवताततेफ़क्तक्षण
हवाअसतोतुझाहसरासहवास.
आणीसोबत….तुपण
पणतुझ्यातअसतेओढ
बदल्याची……..
चोविसतासवेळतुझ्या
खटल्याची…….
उबआलायआतामला
तुझ्याअस्तिव्ताच्याधड्यांचा
मीशून्यहोऊनजगलोचना
कधीकेलाकाप्रश्नयाबेड्यांचा?
मीस्वीकारतआलोयतुला
तुझ्याअहंकारासकट
पणआजकळतयसगळचजातयफ़ुकट…..

लव्ह मॅरेज असो की अरेंज..

लव्ह मॅरेज असो की अरेंज.. लग्नावेळी मुलाकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जातात. मुलगी मिळवती असली तरी घर, नोकरी, गाडी अशा गरजाही मुलानेच पूर्ण करण्याची


पद्धत आजही दिसतेय. संसार दोघांचा असेल तर, मुलींनी या पारंपरिक अपेक्षांवर एकदा नक्कीच विचार करायला हवाय.

नम्रता वय वर्षं २० आणि आदित्य वय वर्षं २२ फक्त… दोघंही एकमेकांसाठी प्रेमात वेडी झालेली. समजून उमजून वागणाऱ्या कपलमध्ये फक्त गफलत होत होती ती अपेक्षांमध्ये… विशेषत: नम्रताकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांमध्ये. स्वत:चं घर, शक्य असल्यास एकुलता एक, उत्तम मासिक उत्पन्न या लग्नापूवीर्च्या बेसिक अपेक्षा मुलाकडून केल्या जातात. त्या सगळ्याच पूर्ण करण्याचा तो परोपरीनं प्रयत्नही करत असतो. आदित्यचीही अशाच प्रकारची ओढाताण होत होती. आदित्यनं नोकरीच्या ठिकाणाच्या जवळच वन बीएचकेचा ब्लॉक घेतलेला. स्वत:च्या जिवावर… पण त्यानं थोडं लांब घर घेतलं असतं तरी चाललं असतं. ब्लॉक थोडा मोठा मिळाला असता. ही तिची तक्रार.



लग्न व्हायच्या आत त्याचं सेटल होणं मुलींच्या पालकांबरोबरच तिलाही गरजेचं वाटत होतं. समवयस्क असल्याने प्रगतीचा आलेख एकाच रांगेने जाणं साहजिक आहे. मात्र केवळ तो मुलगा आहे म्हणून त्याचं सेटल होणं गरजेचंच आहे असं तिचंही मत होतं.

– काही पारंपरिक अपेक्षा

दरवेळी मुलांनीच आधी घर घेऊन ठेवायचं. त्यांनी लग्नाआधीपासूनच सेटल असलं पाहिजे हा अट्टाहास ठेवणं खरंच कितपत योग्य आहे? मुलीही तितक्याच कमावतात. क्वचितप्रसंगी मुलांपेक्षा जास्तही. मग मुलींनीही घराच्या उभारणीसाठी हातभार लावला आणि त्या घराला ‘त्याचं‘ न ठेवता ‘आपलं‘ म्हटलं, तर बिघडलं कुठे? अर्थात, मुलाच्या वाडवडिलाजिर्त घरातच राहाण्याची तिची तयारी असेल, तर काहीच प्रश्न नाही. मात्र, वेगळं राहायचं ठरवलं असेल, तर तेवढाच पगार स्वत: मिळवत असतानाही घर केवळ त्याचंच असावं ही अपेक्षा असायलाच हवी का?

– ‘गर्ल कॅन ऑल्सो बी ए मॅन इन द फॅमिली‘ असंही असू शकतंच की. स्वत: ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता असलेली एखादी मुलगी नवऱ्याच्या घरच्यांना सांभाळूनही महत्त्वाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकतेच की. मात्र, आपणहून घेतलेल्या निर्णयांना नवऱ्याचा पाठिंबा असावा, (अगदी पूवीर् बाबा देत असत तसा) अशी अपेक्षा मुली ठेवत असतील, तर अर्थातच त्यात काही गैर नाही. फक्त हे मुलांनीही समजून घ्यायला हवं.

– मुली किंवा मुलंही जर लवकर कमिटेड स्टेटसमध्ये आली, तर अनेकदा हे अडथळे जाणवतात. किंवा मग मुला-मुलीच्या वयातलं अंतर कमी असेल, तरी त्यांना अडचणी सोडवताना त्रास होऊ शकतो. एकमेकांना अभ्यास, करिअरमधली स्टॅबिलिटी या सगळ्या व्यापात वेळ देणं कठीण होऊन बसतं आणि अगदीच छोट्या-मोठ्या कारणांवरूनही क्वचितप्रसंगी भांडणं व्हायला लागतात.

प्रत्येकाचं रिलेशनशिप स्टेटस वेगळं असतं. तरीही मुलांकडूनच अनेकदा बक्कळ अपेक्षा ठेवल्या जातात. कोणत्याही क्षेत्रात मुली जेव्हा मुलगी म्हणून मला वेगळा न्याय लावता कामा नये असं म्हणतात तीच बाजू संसारात मात्र, तशीच ठेवायला त्यांची ना असते (अर्थातच, अपवाद वगळता). गाडी त्यानं खरेदी करायची. घरंही त्याचंच हवं. कापड खरेदी त्

डोळ्यांचे भरणेही किती

डोळ्यांचे भरणेही किती
भावनाप्रधान असते ,
न समजणाऱ्या शब्दांचा
अर्थ सहज समजून जाते ……
******************************
******************************
रडत – रडत माणूस
जीवनाच स्वीकार करत असतो ,
येणाऱ्या सुख -दु:खाना
तो प्राधान्य देत असतो ….
*******************************
********************************
दु:ख म्हणजे
काय असते ?
मनावर अपेक्षांचे
एक प्रकारचे वजन असते ……

*******************
*******************
मनाला लागलेली सवय
मी तिथेच मोडत असते ,
कारण, मन आपले असते
सवय मात्र दुसऱ्याची असते ….

*******************
*******************
मनावरील नियंत्रणाने
माणूस काहीही साध्य करू शकतो
सरळ वाटेतील डोंगर पोखरून
वाकडी वाट टाळू शकतो ……

********************
********************

नसतो माणसाचा आठवणीवर ताबा
हे आज मला कळले होते ,
सगळे असूनही जवळ जेव्हा
आठवणीनी मला वाळवंटात नेऊन फेकले होते ………….

आहात तुम्ही सावरायला म्हणुन

आहात तुम्ही सावरायला म्हणुन
पडायला आवडते…
आहात तुम्ही हसवायला म्हणुन
रडायला आवडते…
आहात तुम्ही समजवायला म्हणुन रूसायला आवडते…
… … … आहात तुम्ही सांगायला म्हणून
कुठेतरी चुकायला आवडते…
आहात तुम्ही पहायला म्हणून
काहीतरी करायला आवडते…
आहात तुम्ही शोधायला म्हणून
कुठेतरी निघुन जायला बरे वाटते…
आहात तुम्ही काळजी घ्यायला म्हणून
आजारी पडायला बरे वाटते…

माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे मित्र म्हणुन मला जगायला आवडते…!!!

तू ऐकत का नाहीस ?

प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ........... तू ऐकत का नाहीस ?

प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचे tension देत आहेत ....लग्नाला नाही म्हणतआहेत .....!!

प्रेयसी :- हे tension मला पण आहे ............ पण म्हणून मी पिते का सिगारेट ?

प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना......... !!!

प्रेयसी :- अरे म्हणून काय,सिगारेट, दारू, चीडचीडपणा......हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?

प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ...... त्यापेक्षा घरच्यांना कसेसमजावयाचे त्याचा विचार कर !!

प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ............... ...

प्रियकर :- म्हणजे ?

प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..

प्रियकर :- कुठे ?

(तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते............... . मंदिरात आल्यामुळेत्याला सिगारेट फेकून द्यावी लागते, तो

नाराजीनेहाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो)

प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपतीबाप्प्पा ला म्हणते :- हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक

दिवस .......... ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट

तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!!

बायको पाहिजे कशी तर म्हणतात..

बायको पाहिजे कशी तर म्हणतात..
जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी..

"तिला समजू नका हो तुमचा नौकर..
जीन जीवन भर कराव तुमची चाकर.".
"पुरुषाच्या मना येव्हडे कसे कळेना..
आणि बरोबर जागेवर लक्ष्य त्याचे वळेना.".
"मग ती कशी पण असो..चालेल.."

अहो कस चालेल..काळी असली तर..
नाही हो देखणी असायला हवी..
आणि हातात लेखणी असायला हवी..
नुसती लेखणी चालणार कशी..
कपा खाली लागत नाही का बशी..

"आता काय नौकरी वाली चालणार.".
मग घरात भाकरी कोण घालणार ..
अहो पाहिजे तर कशी..?

जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी.
असावी ती दहावी पास..
आणि दिसायला पण खूपच खास..

"आधी बघा किती झालाय तुमच वय..
तुम्हा बघूनच वाटेल हो तिला भय.".

वाटूद्याना हो तुमच काय जातंय..
आणि तुमच्या बापच कोण खातंय

"अहो तिचे माय-बाप ऐकून काय म्हणतील..
आणि लोक पण तुम्हा जोड्याने हाणतील"

मग नौकरी वाला म्हणून सांगा ..
बघा कश्या लागतील माझ्या पुढे रांगा.

"थोडी तर वातुद्याहो हो तुम्हाला लाज..
एव्हडा कसा सुटला हो माज."
"दिसायली असली तरी खूपच साजूक..
तीच मन खूप असतंय हो नाजूक.".

मग मला काय करायचंय ..
फक्त माझ पोट भरायचंय ..
मग नाजूक असो व लहान..
ठेवा म्हणा माझ्या कडे गहान...

"पैश्या चा दाखवून हो नाद..
आयुष्य करू नका तीच बरबाद.."
"वयाला शोभेल अशी बघा..
मग नेसवा तिला झगा
ती पण दिसेल लहान..
आणि लोक पण म्हणतील महान.."

न्हाय न्हाय न्हाय..
मला बायको पाहिजे अशी .
जशी कपा खाली बशी
आणि डोक्या खाली उशी..

"मग काढून टाका तुमची मिशी..
आणि हाकत बस म्हशी"
"तुम्ही म्हणता बायको जशी..
आता मिळणार नाही तशी..
आता पोरी लय भारी शिकल्यात..
आणि तुमच जग त्या जिंकल्यात..
तुमचा नाद सोडा खुळा
आणि चांगल्या रस्त्यावर वळा"
राहील नुसताच खुळा कप..
मग संन्याश्या सारख करा जप.."

पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात

पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारोलोकांना दर्शन

देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतीलतेव्हा तू आता

विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"











त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभारहा"





पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.











तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,





श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"



(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला , पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्यानेगोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )

गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करूनघे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला,मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीटचोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतोकि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानूनतेथून निघून जातात.)

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवसहे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझामाझ्यावर

(देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........

पांडुरंग पुढे म्हणतो .........

अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवीहोती.

त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

आठवणींच्या सागरात मासे कधीच पोहत नाहीत..

आठवणींच्या सागरात मासे कधीच पोहत नाहीत..


अमावस्येच्या रात्री चंद्र कधीच दिसत नाही...


कितीही जगले कोणी कोणासाठी.. कोणीच कोणासाठी मरत नाही...


अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही...


आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर.. त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही..!!

Ek Shaks Pas Reh Ke Samjha Nahi Mujhe

Ek Shaks Pas Reh Ke Samjha Nahi Mujhe
Is Baat Ka Malal Hai Shikwa Nahi Mujhe

Main Us Ko Bewafai Ka Ilzam Kaisay Dou
Us Ne To dil Se Hi Chaha Nahi Mujhe

Pathar Samajh Kar Paon Se Thokr Laga Dia
Afsos Teri Aankh Ne Parkha Nahi Mujhe

Kya Umedein Baandh Kar Aaya Tha Samnay
Us Ne To Aankh Bhar Ke bhi Dekha Nahi Mujhe!!!



Sochte h ki aapka naam kya rakhe,
sirf dost rakha to ruth jaoge
Khwab rakha to tute jaoge,
chalo aapka nam zindgi rakh de
kum se kum maut tak to saath nibhaoge.

एका मुलाची कथा

एका मुलाची कथा
७ वी ला असताना ...

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ...
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??":(((

कॉलेग ला असताना

माझ्या फोन वर call आला...
तिचा चा होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती
आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का???
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडी त जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ...

PROM निघत ला ...

prom NIGHT ला सगळ काही नित झाल..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION दय ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation दय आला ...
मी तिला पाहिलं ...
तीनेव साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना
आमची शेवरी ची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ...
आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्चा निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस"असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी...
मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...
तिथे आमच्या वर्गातले सगळे जन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...
7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा"
college year:"आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झाला तरी हा वेडा माझ्या साठी आलं"
prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बगहातेय,...
मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."
graduation year:"किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही"
marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील....."

निळ्या स्वेटर मध्ये ती किती चोख दिसते ,

निळ्या स्वेटर मध्ये ती किती चोख दिसते ,
आज मला थंडीत या न्हाव्हेसे वाटते ,
पाहुनी मला ती किती छान लाजते ,
आज मला मिठीत तिला घ्यावेसे वाटते ,
मिलिंद . . .



खुभी नाही माझ्यात एवढी कि..!
कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल..!
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल..!
असे अविस्मरणीय क्षण जे देऊन जाईल.......!

Miscall देऊन वैताग आणणारी ,

Miscall देऊन वैताग आणणारी ,

नेहमी Blank Message पाठवणारी ,

हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल
,
वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out

करणारी ,

मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून पोट

दुखेपर्यंत हसवणारी
,
काही आगळीक घडली तर सणसणीत मुस्कटात

ठेवणारी ,

आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी ,

कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर न

चिडणारी
,
थोडीशी Short - Tempered
,
अशीही एखादी मैत्रीण असावी .

सगळ्याच वाक्यात शब्द कुठे असतात?

सगळ्याच वाक्यात शब्द कुठे असतात?

रिकामी असून पण ती खूप खोल का असतात?

सगळ्याच फांदीवर पान कुठे असतं?

सगळ्याच सुंदर चेहऱ्यामागचं मन छान कुठे असतं?



अळवावर कधी थांबतंय का पाणी?

तात्पर्य नसणाऱ्या पण असतात कहाणी,

सगळ्याच हसण्यांचा अर्थ कुठे कळतोय?

कुणाला माहितीय हा सूर्य का जळतोय?



प्रत्तेक तहान पाण्याने कुठे भागते?

हवं ते माणूस हवं तेव्हा हवं तसं कुठे वागते?

प्रत्तेक जखमेतून रक्त कुठे वाहते?

उघडी नजर तरी….सगळं कुठे पाहते?



प्रत्तेक हसरा चेहरा खुश कुठे असतो?

काही काही वाटांना शेवट का नसतो?

ज्याने "थांबावे" असे वाटतं

त्याला नेहमी जायचं का असतं?

मनाला या ठरलेल्याच माणसांसोबत

खुप वेळ राहायचं का असतं?

सगळे प्रश्न असे विचित्र?

त्यांची उत्तरं पण विचित्र…

एकदा मी स्वप्नात देवाला विचारले ……..

एकदा मी स्वप्नात देवाला विचारले …….. .
" तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस ???"
देव म्हणाला , " मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही ….."
… मी म्हणालो " याचा अर्थ मी तुला आवडत नाही ???"
देव म्हणाला , " तस नाही रे ! तु पण मला खुपआवडतोस !"
मी म्हणालो , " मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे ???"
देव म्हणाला , " तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस ….

मुली असतात फुलासारख्या

♥ मुली असतात फुलासारख्या ♥
♥ मुली लहान मुलासारख्या ♥
♥ त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे ♥
♥ त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे ♥
♥ मुली म्हणजे relations ♥
♥ मुली म्हणजे emotions ♥
♥ छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसणार्‍या ♥
♥ शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्‍या ♥
♥ मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला ♥
♥ मुली म्हणजे मोर श्रावणातल्या ♥
♥ मुली म्हणजे ठासून सौंदर्य ♥
♥ मुली म्हणजे त्याग औदार्य ♥
♥ मुली असतात softcorner ♥
♥ मुली असतात melting point ♥
♥ घसरत्या आमच्या career च्या मुलीच असतात turning point ♥
♥ त्यांच नुसत smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू ♥
♥ पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू ♥
♥ मुली वाटतात हव्याहव्याश्या ♥
♥ मुली वाटतात आपल्याशा ♥
♥ आमच मन समजून घेणार्‍या ♥
♥ दुखात आम्हाला आधार देणार्‍या ♥
♥ कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला ♥
♥ काही नाव नसत पण तरही ते जपायच असत….. ♥

स्वप्न" म्हणजे इच्छेचे प्रतिबिंब….

इच्छा" या शब्दाची व्याख्या तशी कठीण नाही…..
प्रत्तेक इच्छेत काही न काही हवंच असतं…कधी पैसा,कधी प्रेम,कधी प्रसिद्धी तर कधी माणसं.
जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत साथ देणारी गोष्ट म्हणजे "इच्छा"….
आणि
"स्वप्न" म्हणजे इच्छेचे प्रतिबिंब….
… … काहीजण म्हणतात,"आता काही इच्छा नाहीत,इतके वाईट झाल्यावर सर्व इच्छा मेल्या आता"…
पण
"आता मनात कोणतीही इच्छा येऊ नये" हि पण एक इच्छाच असते"..हि गोष्ट आपण विसरतो.
काही इच्छा पूर्ण नाही झाल्या कि,मनात आग लागते….
आणि सगळ्याच आगी अश्रूंनी विझवता येण्यासारख्या नसतात….त्या सतत धगधगत राहतात…

"काही माणसं आधीच जळलेली असतात…स्मशानात आग देहाला लावली जाते"

त्याची अन तिची पहिली भॆट

त्याची अन तिची पहिली भॆट

दोघांची होणाऱी "नजऱभेट"

काळजाला जाऊन भिडणारी थेट

दोघांचं एकमेकांना पाहून हसणं

अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं...

या हसण्या या फसण्याची

सवय झालीय सगळयांना...

नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत

भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत

अन त्याहीपुढे कित्येक पटीत

नात्यातल्या या वेगाची

सवय झालीय सगळयांना...

मग रंगू लागतात स्वप्नं

एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं

त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं

तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं

या हसण्या या रडण्याची

सवय झालीय सगळयांना...

दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा

घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा

त्याला ती वाटते "रांझ्याची हीर"

तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर"

या शपथा या उपमांची

सवय झालीय सगळयांना...

मग येतो असाही एक दिवस

पूनवेची रात्र वाटू लागते अवस

दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा

हीर वाटू लागते "बधीर" अन

रणबीर वाटू लागतो चक्क "काळा"

या अवसेची या पूनवेची

सवय झालीय सगळयांना...

पहिल्या भेटीच्या चौकातच

फूटतात "नव्या वाटा"

दोघंही करतात एकमेकांना "टाटा"

अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब

दुःख वैगरे विसरा

त्याला भॆटते दूसरी

तिलाही भॆटतो दूसरा

पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक"

पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक"

बदलत्या प्रेमाच्या रंगाची

सवय झालीय सगळयांना...

खरं सांगायचं अगदी मनापासून तर

प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची

सवय झालीय सगळयांना...

सांग कसा मी विसरू तिला

सांग कसा मी विसरू तिला

ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात
आणि प्रत्येक स्पदनांत तिचा आहे
एकवेळ ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल
मग ह्रदयाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
आणि प्रत्येक विचारात तीच आहे
एकवेळ तिचा विचार करणं बंद करेल
मग मनाचं काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नात
आणि प्रत्येक जाणिवेत तिच आहे
एकवेळ स्वप्न बघण बंद करेल
मग अंतकरणाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

माझ्या प्रत्येक प्रत्यनात
आणि प्रत्येक आठवणीत तिचं आहे
एकवेळ आठवण काढण बंद करेल
मग माझ काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

दूरवरच्या माळावर

दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे
... माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात
पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मलाकळला होता

रेशनच्या भाताचा सुवास हरवला .

Designer कपडयांच्या ढिगाऱ्यात,


१३ जून च्या स्कूल युनिफोर्मचा वास हरवला .


बासमतीच्या मंद घमघमाटात ,


... रेशनच्या भाताचा सुवास हरवला .


Dark Fantasy च्या जमान्यात

,
Parle च्या sharing चा आनंद हरवला.


Dairy मिल्क भपकारयात,

लिमलेटच्या गोळ्यांचा छंद हरवला.

सुट्ट्यांच्या दुष्काळात,

मामाचा गाव हरवला.

Kelloggs च्या ब्रेकफास्ट मागे लागून,

नाश्त्याचा चहा अन पाव हरवला .

नात्यांच्या सुपर मार्केटमध्ये,

आपुलकीचा सहवास हरवला.

नाण्यांच्या खूळखूळाटात,

माणसांचा आवाज हरवला ...