Monday, December 5, 2011

नकार तुझ्या ओठांवर..

मऊ मऊ चादरीत...
झोप माझी पळून जाई..
झोप मला शांत लागे..
तुझ्या मिठीतच गं आई..



दिवस सरता सरता....
तूझ्या आठवणी दाटून येतात...
तू कितीही नकार दिलास तरी....
त्या तुझ्या नकळत मला भेटून जातात...



दिशा बदलून जाते हवा....
तू येण्याचा भास होताच...
मी पण बहरून जातो....
तुझी चाहूल लागताच...




नकार तुझ्या ओठांवर...
मनात मात्र होकार....
हृदयाच्या बंद पाकळीत....
कधीच केला मी तुझा स्वीकार..

तुझ्या डोळ्यात मला... माझचं प्रतिबिंब दिसतं...

एकदा तुला भेटायचे आहे....
मांडीवरतुझ्या झोपायचे आहे...
खांद्यावर डोके ठेवून तुला...
पुन्हा पुन्हा निहारायचे आहे..



संध्याकाळचा संधी प्रकाशात.....
फुलून जातेस तू साजणे ....
तो रवी देखील विसरून जातो मग....
अस्ताला जायचे, पाहून तुझे गोड लाजणे....




चढली हि माझ्यावर ..
तुझ्या ओठांची नशा....
स्पर्श होता त्यांचा...
भुलवी माझी दिशा...




अळवावरच्या थेंबाला...
ओढ ही कुठली...
अळवाच्या पानावरचं...
त्याची जिवन शैली मिटली.



तुझ्या डोळ्यात मला...
माझचं प्रतिबिंब दिसतं...
तु मला पाहत असताना..
माझं मन ही तुझ्यात फ़सतं



तुला पाहते रे मी...
डोळ्यांचे पारणे फ़िटे पर्यंत...
डोळ्यात तुझं प्रतिबिंब साठवेन...
डोळ्यात प्राण असे पर्यंत...

आठव

सिगारॆट शिलगावताना ,
आई , वडिलांनी लावलॆली अगरबत्ती आठव ;

दुसऱ्यावर काठी उगारताना ,
शिक्षकांनी हातावर मारलॆली पट्टी आठव ;

दारुचा घॊट घॆताना ,
ऒंजळीत घ्यायचास तॆ तीर्थ आठव ;

दुसऱ्याला अर्वाच्य शिव्या दॆताना ,
तुझ्या बालपणीच्या बॊबड्या बॊलातील अर्थ आठव ;

इतरांचॆ परिश्रम मातीत मिळविताना ,
तुझ्या बाबतीत हॆच झाल्यावर हॊणारा त्रास आठव ;

आग लावून जाळपॊळ करताना ,
तुझ्या अंगणातल्या मातीचा सुवास आठव ;

पॊलिसांचॆ फटकॆ खाताना ,
तुझी पहीली चूक आठव ;

दुसऱ्याच्या पॊटावर पाय दॆताना ,
तुला कडाडून लागलॆली भूक आठव ;

स्त्रीच्या अंगावर हात टाकताना ,
तुला राखीपौर्णिमॆला न चुकता यॆणारी राखी आठव ;

घरॆ अन वाहनॆ जाळताना ,
तुझी पहीलीवहीली सायकल ' दुचाकी ' आठव ;

हफ्तॆ गॊळा करताना,
घरच्यांनी तुझ्यासाठी गाळलॆला घाम आठव ;

गुन्हॆगारांच्या यादीतला फॊटॊ पाहून ,
मित्रमैत्रिणींनी ठॆवलॆलं तुझं विशॆषनाम ( टॊपणनाव ) आठव ;

दगडफॆकीला दगड उचलताना ,
पाण्यात टाकलॆला खडा आठव ;

दंगली करुन दॆश बर्बाद करताना ,
तॊ स्वतंत्र करायला दिलॆला लढा आठव ;

स्वप्नात कुणाला असंही बघु नये

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे

शब्द मी ओठावर अडखळलेला...

कधी कळलाच नाही तुझा तो ओझरता स्पर्श..
तुझं मन भरून मला पाहण...
खांद्यावर डोकं ठेऊन...
मला निहरात राहण..




शब्द मी ओठावर अडखळलेला...
शब्द मी मनात घोळणारा..
शब्द मी तुझ्या भावना समजणारा..
शब्द मी तुझ्या ओठांना बोलके करणारा..

जो हमारे बहुत करीब है

तु मला पाहुन...
रोज हसत पुढे जायचीस...
मी अजुन हि तुला पाहतोय का..?
सारखे मागे वळून पाहायचीस..




शेवटची भेट तुझी आठवता.....
आठवणी दाटतात मनात....
आठणींना पूर आला कि
जीव अडकतो कंठात...





दुर तू असलीस तरी..
तुझ्या आठवणी आहेत सोबत...
त्यांच्याच सहवासात तर..
मी रोज असतो रात्र रात्र जागत..



जो हमारे बहुत करीब है
उसे हम छू नही सकते
शायद इसे 'मजबूरी' कहते है, जो हमे
चाहता है
उसे हम पा नही सकते
शायद उसे 'नसीब' कहते है!"
इसी 'मजबूरी' और 'नसीब' के बीच एक
रिश्ता पनपता है
शायद इसे "मोहब्बत" कहते है!!...

चेहरया वरचा पदर जेव्हा..

तू बोलत असलीस कि..
नुसतेच तुला पाहत असतो.....
तुझ्या प्रत्येक शब्दाला....
माझ्या कवितेसाठी चाळत असतो...




चेहरया वरचा पदर जेव्हा..
हातुन तुझ्या सरकतो....
आकाशातील चंद्र देखील..
त्याचे प्रतिबिंब पाहून फ़सतो..



तुझ्या साठी जगायचे आहे....
तुला स्वप्नात जागवायचे आहे...
डोळे मिटता समोर तूच दिसावीस....
असेच काहीसे स्वप्न रोज पहायचे आहे...




रंग मी चढवला....
तुझ्या प्रेमाचा अंगावरी...
दूर असूनही तू, नाव तुझे....
सतत येते ओठावरी...



तुझ्या सौंदर्याने माझ्या ...
दाही दिशा सजलेल्या..
तुझ्याच स्वप्नात मी माझ्या...
साऱ्या रात्री जगलेल्या...




पोहचू दिलेच नाही कधी तुझ्या पर्यंत...
जे लपलय माझ्या शब्दात...
कसे सांगू गं तुलां मी....
अजुन ही जपतोय तुला स्वप्नात..