Thursday, January 17, 2013

साईनाथाने कृपा केली

1 थोर तुझे उपकार, साई थोर तुझे उपकार ॥धृ॥ भक्तजनांच्या संकटसमयी तूच एक आधार । भक्ति करतां मुक्ति मिळते, ऐसी ख्याती अपार । श्री साईच्या शिर्डी नगरी भक्तगण येती हजार । शतजन्माचा फेरा चुकवूनी मागती तुझाच आधार । स्मरण तुझ्या शिर्डीचे मज होते अनिवार । नित्य वाटते दर्शन घेण्या, यावे वारंवार ॥ 2 साईनाथाने कृपा केली साईबाबा गरीबाचे वाली आशा माझी परिपुर्ण झाली . ॥धृ॥ कैक दु:खात शिरडीस जाती, खाली हाताने ना कोणी येती, आशा होईल पुरी साईबाबा करी, दिनानाथाची ती गुरु माऊली ॥१॥ घरोघरी साई पुजा चाले साई, भक्तांच्या हृदयात डोले ज्यांची भक्ती खरी, साईबाबा वरी येईल स्वप्नातली गुरु माऊली ॥२॥ जन्मा येऊनी शिरडीस जावे, साई दरबार पाहुनी यावे किसन म्हणॆ, खरे तुमचे होईल बरे गुरु कृपेची मिळता हो साऊली ॥ साईबाबा ॥३॥ ज्याच्या घरी आला साई त्याची हीच खरी पुण्याई

No comments:

Post a Comment