Tuesday, April 12, 2011

परतणं कस जमेल आता?

परतणं कस जमेल आता?
येणं-जाणं माझ्या हातात असतं तर...
तर तेव्हाच तुझ्यापासून दुर झाले असते का???

अस्तित्व पणाला लावलं,
तुझ्यापासून दूर होऊन.
काही उरलचं नाहीये आता माझं....
मन तेव्हाही तूच व्यापलं होतंस आणि आताही तुच...
जगणं चाललंय ते फक्त तुझ्या आठवणींवर
त्याही लपून आठवाव्या लागतात

अस्तित्वहीन आयुष्य जगतेय
कदाचित फक्त कर्तव्यासाठी.....

तुला नाहीत ना बंधनं कसलीच?
म्हणुनच सांगतेय,
गोंजार माझ्या आठवणींना...
जप त्यांना मुक्तपणे....
मोकळा श्वास घेतील त्या तुझ्याकडेतरी...
आणि त्यांच्याबरोबर कदाचित मीही.

असंच जगुयात आपण
परतणं तेवढं नाहीच जमणार.....

No comments:

Post a Comment