अवघ्या महाराष्ट्र-सह्याद्रीचं दैवत पहिले छत्रपती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता श्री शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जीजाऊ, अखिल सह्याद्रीचा छावा, बाविसाव्या वर्षी स्वराज्याची जबाबदारी अंगावर पडलेली असताना सलग नऊ वर्षे औरंगजेबला झुंझवणारे, मरणाच्या दाढेत म्रुत्युलापण भिकारी करणारे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती शंभुराजे आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणाऱ्या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडवीणारे छत्रपति राजाराम राजे….यांना प्रणाम..!!!
मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाहीशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
राजांनी स्वराज्य स्थापना गडावरूनच केली. स्वराज्य स्थापणेच्या सुरवातीला महारांचे शत्रु सामर्थ्याने,फ़ौजेने त्यांच्यापेक्शा बलवान होते. अशा वेळी समर्थ शत्रूवर मात करण्यासाठी भरभक्कम किल्ले नव्याने बांधणे शक्य नव्हते. दुर्ग नैसर्गिक द्रूष्ट्या अभेद्य होतेच. पण ते शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी दुर्गांचे काटेकोर व्यवस्थापन त्यांनी केले. किल्ल्यांच उपयोग राजांनी राज्यनिर्मितीसाठी, राज्यव्रूध्दीसाठी आणि स्वराज्यरक्षणासाठी केला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करताना सह्याद्रीच्या पर्वतराजीतील उत्तुंग दुर्गांचा मोठ्या कौशल्याने उपयोग करून घेतला होता. शिवचरित्राचा अभ्यास करताना, सह्याद्रीच्या कुशीतील गिरिदुर्गांनी स्वराज्यबांधणीमध्ये किती महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती याची प्रचिती येते.
संपूर्ण राज्याचे सार ते दूर्ग या एकाच वाक्यात आमात्य रामचंद्रपंतांनी शिवकाळातील किल्ल्यांचे महत्व स्पष्ट केले आहे. " दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. देश ?द्ध्वस्त झालीयावरी राज्य असे कोणास म्हणावे ? याकरीता पूर्वी जे जे राजे झाले, त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परीहार केले. हे राज्यतर तीर्थरूप थोरले कैलासस्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. गडकोट विरहीत जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे. या करीता ज्यास राज्य पाहीजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजेच खजीना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहूना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे चित्तास ?णून कोणाचे भरवशांवर न राहता त्याचे संरक्षण करणे." असेही ते लिहितात.
प्रचंड, सम्रुद्ध, बेलाग अशा या सह्याद्री आणि सह्याद्रीतील गड-कोटां विषयी फ़ार कमी लोक जवळुन परिचित आहेत. खरे तर हे गड कोट म्हणजे या महराष्ट्राचे वैभव. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात एक ?िचार चालु आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची व दुर्गांची माहिती देणारी एक वेबसाइट काढण्याचा. जेणेकरुन आजपर्यंत दुर्लक्षित राहीलेल्या या गड दुर्गांची माहिती हजारो दुर्गप्रेमींना मीळेल. मला असा अनुभव आला आहे की सर्वांणाच या गडांवर जाण्याची खुप इच्छा असते. पण तीथे जायचे कसे हे माहित नसल्यामुळे व इतर माहिती उपलब्ध नसल्यामुळे ते तिथे जात नाहीत. आणि हे इतिहासाचे साक्ष देणारे दुर्ग अजुनच दुर्लक्षिले जातात.
शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप | मराठी अड्डयावरील सर्व मित्रांसाठी आपल्या महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या किल्ल्यांची सुची देत आहे.
किल्ल्याचे नाव स्थान पर्वतरांग उंची स्वराज्यात आल्याची तारीख प्रकार चढाईची श्रेणी गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
रायगड रायगड सह्याद्री ८२० मीटर ६ एप्रिल १६५६ गिरिदुर्ग सोपी पाचाडचा जिजाबाईंचा वाडा , खुबलढा बुरूज , नाना दरवाजा , मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा , महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव , गंगासागर तलाव , स्तंभ, पालखी दरवाजा , मेणा दरवाजा , राजभवन, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिर्काई देऊळ , जगदीश्र्वर मंदिर , महाराजांची समाधी , कुशावर्त तलाव , वाघदरवाजा, टकमक टोक , हिरकणी टोक , रायगडावरील अश्मयुगीन गुहा.
राजगड पुणे-वेल्हे सह्याद्री-मुरुंबदेवाचा डोंगर १३९४ मीटर १६४६ ते १६४७ गिरिदुर्ग मध्यम सुवेळा माची, पद्मावती तलाव, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, पद्मावती मंदिर, संजीवनी माची, काळेश्र्वरी बुरुज आणि परिसर, बालेकिल्ला.
तोरणा / प्रचंडगड पुणे-वेल्हे सह्याद्री-भुलेश्वर डोंगर १४०० मीटर १६४६ ते १६४७ गिरिदुर्ग मध्यम बिनीचा दरवाजा, कोठीचा दरवाजा, तोरणाजाईचे मंदीर-येथेच महाराजांना मोहरांचे हंडे सापडल्याच्या नेंदी आहेत, तोरण टाळे, खोकड टाके, मेंगाईदेवीचे देऊळ, दिवाणघर, तोरणेश्वर महादेवाचे मंदिर, बुधला माची, भगत दरवाजा, घोडजित टोक, बाळणजाई दरवाजा, चित्ता दरवाजा, कापूरलेणे, झुंजार माची.
पुरंदर पुणे-नारायणपूर सह्याद्री-भुलेश्वर डोंगर १००० मीटर सन १६५५ गिरिदुर्ग सोपी बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदकडा, पद्मावती तळे, शेंदर्या बुरूज, केदारेश्वर, पुरंदर माची, भैरवगड, वीर मुरारबाजी.
सिंहगड पुणे-खडकवासला सह्याद्री-भुलेश्वर डोंगर ११०० मीटर ४ फेब्रुवारी १६७२ गिरिदुर्ग मध्यम दारूचे कोठार , टिळक बंगला , कोंढाणेश्र्वर, देवटाके, कल्याण दरवाजा, उदेभानाचे स्मारक, डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा, राजाराम स्मारक, तानाजीचे स्मारक, पुणे दरवाजा.
लोहगड लोणावळा- मळवली सह्याद्री-मावळ ८५५ मीटर सन १६५७ गिरिदुर्ग सोपी गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा, विंचुकाटा, लक्ष्मीकोठी,
विसापूर लोणावळा- मळवली सह्याद्री-मावळ ८७५ मीटर सन १६५७ गिरिदुर्ग सोपी मारुतीचे देऊळ , मोठे जातं.
तिकोना लोणावळा-कामशेत सह्याद्री-मावळ ११०० मीटर सन १६५७ गिरिदुर्ग सोपी त्रिंबकेश्वर, एक तलाव, २ तळी, धान्य कोठार, बालेकिल्ला, तुळजाईचे मंदिर, मंदिर असलेले लेणे
तुंग लोणावळा-तुंगवाडी सह्याद्री-मावळ १००० मीटर सन १६५७ गिरिदुर्ग सोपी हनुमान मंदिर, गणेशाचे मंदिर, पाण्याचा खंदक, तुंगीदेवीचे मंदिर, जमिनीत खोदलेली गुहा
वासोटा (व्याघ्रगड) सातारा-कूसापूर सह्याद्री-महाबळेश्वर ११६६ मीटर सन १६५६ वनदुर्ग मध्यम-अवघड शिवसागर जलाशय, पाताळवेरी दरी, मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष, महादेव मंदिर, उत्तरेकडील माची,
प्रतापगड सातारा-आंबेनळी घाट सह्याद्री-महाबळेश्वर ११८५ मीटर सन १६५६ गिरिदुर्ग मध्यम पश्चिमाभिमुख महादरवाजा, चिलखती बांधणीचा बुरूज, भवानी मंदिर, हंबीरराव मोहिते यांची तलवार, समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती, महादेवाच्या मंदिर, राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष, छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, दिंदी दरवाजा, यशवंत बुरूज, सूर्य बुरू,
सज्जनगड (किल्ले परळी) सातारा-परळी-गजवाडी सह्याद्री-सातारा ११६६ मीटर २ एप्रिल इ.स.१६७३ गिरिदुर्ग मध्यम छत्रपती शिवाजी महाराजद्वार, समर्थद्वार, रामघळ, घोडाळे तळे, आंग्लाई देवी, समर्थांचा मठ, श्रीरामाचे मंदीर, भुयारातील स्मारक, अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवर्या, अक्काबाइचे वृंदावन, शेजघर नावाची खोली (त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ति आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे त्यात एक लांबच लांब धारदार तलवार आहे), धाब्य़ाचा मारुती, विरुपाक्ष मंदिर, मोरघळ नावाची गुहा .
पन्हाळा कोल्हापूर सह्याद्री-कोल्हापूर १०१० मीटर २८ ऑक्टोबर १६५९ गिरिदुर्ग सोपी ताराबाईचा वाडा, सज्जाकोठी, राजदिंडी, अंबरखाना, चार दरवाजा, सोमाळे तलाव, रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी, रेडे महाल, संभाजी मंदिर, धर्मकोठी, अंदरबाव, महालक्ष्मी मंदिर, तीन दरवाजा.
विशाळगड कोल्हापूर सह्याद्री-कोल्हापूर ११३० मीटर सन १६५९ गिरिदुर्ग सोपी छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक , वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फूलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी. काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत
शिवनेरी पुणे- जुन्नर सह्याद्री-नाणेघाट ८७५ मीटर सन १५९५ गिरिदुर्ग मध्यम शिवाई देवी मंदिर, अंबरखाना, पाण्याची टाकी, शिवकुंज, शिवजन्म स्थान इमारत, कडेलोट कडा
भरतगड सिंधुदुर्ग मसुरे सह्याद्री ५७५ मीटर सन १६६४ गिरिदुर्ग सोपी बालेकिल्ला, पहारेकर्यांची देवडी, महापुरुषाचे मंदिर, चोर दरवाजा.
अर्नाळा ठाणे - विरार अरबी समुद्र ०८ मीटर सन १७३७ जलदुर्ग सोपी त्र्यंबकेश्र्वराचे व भवानी मातेचे मंदिर, अष्टकोनी तळ, गोडापाण्याच्या विहिरी, कालिकामातेचे मंदिर, गोल बुरुज,
साल्हेर नाशिक-साल्हेरवाडी सेलबारी-डोलबारी(बागलाण) १५६७ मीटर सन १६७१-७२ गिरिदुर्ग मध्यम रेणूका देवीचे मंदिर, माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले. अशी कथा येथे ऐकवली जाते. समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला
विजयदुर्ग रत्नागिरी अरबी समुद्र १५ मीटर सन १६५३ जलदुर्ग सोपी मारुतीचे मंदीर , जिबीचा दरवाजा, दारूकोठार, खूबलढा तोफा बारा, चिलखती तटबंदी, दोन भुयारी मार्ग आहेत.एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे, साहेबांचे ओटे
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मालवण अरबी समुद्र १२ मीटर सन १६६४ जलदुर्ग सोपी दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव (गोड्या पाण्याच्या तीन विहिरी ), जरिमरीचे देऊळ, श्री शिवराजेश्वरांचे देवालय,
वसईचा किल्ला ठाणे -वसई अरबी समुद्र ०८ मीटर सन १७३९ गिरिदुर्ग सोपी चिमाजीअप्पांचे भव्य स्मारक, भव्य चर्च
सुधागड रायगड पाली सह्याद्री ५९० मीटर सन १६४८ गिरिदुर्ग मध्यम सचिवांचा वाडा, भोराई देवीचे मंदिर, पाण्याची टाके, पाच्छापूर दरवाजा, गडावरील टकमक टोक, दिंडी दरवाजा.
!! जय भवानी.....जय शिवाजी !!
कृपया माहिती आवडल्यास आपले मत जरूर कळवा
No comments:
Post a Comment