Tuesday, November 1, 2011

हे खरे प्रेम करतात..

देव मानतात प्रेमाला (?)
आणि ज्याच्यावर प्रेम करतो..
त्याला भिकारीहि नसेल तेवढा लाचार करतात...
प्रेमात उपकार दाखवतात....
भरभरून दुःख ओंजळीत टाकून
हसत रहा म्हणतात....
च्यामारी.. अलिबाग वरून आलो आहे असे समजतात...
आणि जगाला ब्राह्म्हज्ञान शिकवतात..
कळत नाही कोण येडझव आहे..
मी का ते....
जनावरांपेक्षा बत्तर वागून स्वतःला माणूस म्हणवतात...
म्हणे, हे खरे प्रेम करतात..
घंटा... हे फक्त व्यवहार बघतात..

कधीतरी कोणाच्यातरी प्रेमात पडून बघा ~ ~

कधीतरी कोणाच्यातरी प्रेमात पडून बघा ~ ~

तिच्या साठी आपलं दुख काही नाही

पण तिच्या दुखला आपला मानून बघा

परत येण्याची अशा नसतानाही

वाट कोणाची तरी पाहून बघा

कधीतरी एकतर्फी प्रेम करून बघा

नाही केली कधी कोणी तुमच्या भावनांची कदर

तरी तिच्या शब्दांचा मान राखून बघा

तरीही तिला दोष न देता

तिच्या आभार मानण्याचा प्रयत्न करून बघा

कधीतरी कोणाच्यातरी प्रेमात पडून बघा ! ! !

देवळाच्या पायरीवर शांत बसून होतो

देवळाच्या पायरीवर
शांत बसून होतो
भाविकांची रेलचेल
हसून टिपत होतो
भक्ती भाव दाटून आला
सावळा गोंधळ सुरु
मला प्रश्न पडला
आत जाऊन मी काय करू?
मला कधीच नाही भासली
गरज आत जाण्याची
हमी त्याने दिली होती
माझ्या मनात असण्याची...

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!

पेटी भरू दे .................धनाची
काळजी घ्या ............आरोग्याची
रोषणाई असू दे .........कर्तुत्वाची
आतषबाजी होऊ दे ..........यशाची
पूजा होऊ दे .............सरस्वतीची
गोडी राहू दे .................नात्यांची
हीच सुगंधित कुपी .......दीपावलीची !!!!!!!!!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!

तुझ्या हृदयाचे माझ्या हृदयाशी...

तुझ्या हृदयाचे माझ्या हृदयाशी...
बंधन असे हे एक अनोखे....
तु कितिही दुर असलीस तरी...
तुझ्याच आठवणीत हृदय धडधडते सारखे..



तुझं माझं मन,केवड्याचं बन
वाराही थांबतो ,घ्याया त्याचा गंध!

तुझी माझी झोप ,स्वप्नांची खोप
त्यात बघ पडतो ,प्रेमाचा झोत!

तुझी माझी भेट ,आठवणींची पेठ
चल आपण घेऊ ,'सरींचा सेट '!

तुझं माझं नातं ,ऋतूंच जातं
फिरून पुन्हा रोज , नवंच वाटतं!

तुझी माझी साथ ,जणू साखरभात
गोडी त्याची राहो,काळजाच्या आत !

अश्रुंनाही कळते आता..

अस कस नातं आपण..
नकळत जोडून जातो...
तर कधी मनात नसताना ही..
जवळचे नाते तोडुन जातो...




अस कस नातं आपण..
नकळत जोडून जातो...
तर कधी मनात नसताना ही..
जवळचे नाते तोडुन जातो...



अश्रुंनाही कळते आता..
कोण आपले अन कोण परके...
पण आता का वाहत असतात असे...
तुझ्या आठवणीत सारखे..




रचले मी तुझ्यासाठी जेव्हा...
शब्द माझे वेचलेले..
मी आधी मी आधी म्हणत...
सारेच तेव्हा असे बेधुंद नाचलेले..

प्रेम ही एक अशी संकल्पना आहे_

पणतीचा मंद प्रकाश..
रांगोळीचा शोभतो रंग...
फ़राळाची पंगत वेगळीच...
दिवाळीचा हा वेगळाच ढंग...



उगवलेल फुल ते
रानवाटेव एकटच फुलत
उपेक्षितच जीवन स्वतः जगत
पण आनंद आपणास देऊन जात ............



आज सफ़ाई करताना...
तुझा फोटो लागला हाती...
तुला पाहायला तेव्हा...
डोळ्यातुन अश्रूंनी शर्यत लावली होती..




प्रेम ही एक अशी संकल्पना आहे_

ज्याची महती त्या कृष्णालाही झाली नाही_

उगाच तो कान्हा राधा राधा करत होता_

मिराच्या खरया प्रेमाची जाणीव त्याला झालीच नाही_