Friday, October 14, 2011

सुखाची व्याख्या आता करवत नाही

सगळे गोठलेले
श्वास मंद आहेत
शांत राहूनही आज
मनात द्वंद्व आहेत...


सुखाची व्याख्या आता करवत नाही
झालं गेलं भोगलेलं सारंच सुख,
प्रीतीच्या व्यवहारातला मापदंड तोचं
सौदा करून पदरात कमावलेलं दु:ख..!!



चंद्र चांदण्यांच्या मिठीत,
आले अंगावरी शहारे
आज मी पांघरले ,
सुख हे झोंबणारे......!
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ्या..!

No comments:

Post a Comment