आनंदाचा दिवस आज खास
आहे माझ्या मैत्रिणीचा बर्थ डे,
खूप दिवसापासून मनात आस
आज आलाय खरा हा हैप्पी डे..!!
ऑर्कुटची ओळख जुनी आमची
गावही आहे गावा जवळचं,
नात मग लहान-मोठ्या बहिणीच
सहजीच झालं मना जवळचं..!!
वाटतो मायेचा आधार मला
ताई कमी भरून निघाली,
खूप इच्छा होती मोठ्या ताई ची
ने पूर्ण झाली..!!
प्रार्थना बाप्पाला आयुष्य लाभो ताई ला
सुखाची सकाळ रोजचं तिच्या जीवनी,
मायेची उब अशी सतत तेवत राहू देत
गोडचं असावी तिच्या आयुष्याची कहाणी..!!
विसरणार नाहीस कधी तरीही सांगतो
गरज आहे तुझी कायम ह्या भावाला,
झळाळी जशी जीवनात येईल तुझ्या
नव्हाळी चढत राहूदेत आपल्या नात्याला..!!
No comments:
Post a Comment