Sunday, October 30, 2011

वेडे माझे मन गं ! समजावु किती.....?

वेडे माझे मन गं ! समजावु किती.....?
सोडुन गेलीस मला मी झुरावं किती.....?
येशील ना गं भेटायला वाट पाहावी किती....?
नावरुप नसणारी असतात काही नाती.....
मग ती नाती टिकवताना समाजाची का भिती....?
समजुन का घेत नाहिस मला मी झुरावं किती.....?

आज येईन ऊद्या येईन गेली सुट्टी सरुन......
कधी येशील जेव्हा मी जाईन मरुन.....
प्रेम नाहिस करत माझ्यावर माहित आहे मला.....
जाण ठेवावी काही गोष्टींची भान आहे तुला......
झालीस तु दुसय्राची मी झुरावं किती......?

एक वेडा बसला लावुनी तुझी आस......
तीच आस बनु नये त्याच्या जिवनाचा फास......
तुच सांग ना मी विश्वास कुणावर ठेवु.....?
प्रत्येक क्षण , दिवस मी झुरावं किती.....?
दोन घटकेच्या आयुष्यात मी मरावं किती....?
मी मरावं किती.....?

No comments:

Post a Comment