कवेत तुझ्या मी आलो...
अन स्वतः विसरून गेलो ...
तू मिठी घट्ट करताच..
तुझ्यात सामावून गेलो...[[[
नको, नको दावू वाकुल्या जीवनाsss
जिद्द हाये उरी,जरी मोडका कणाsss
लागे लागे तू पुढ पुढ चालला
कवा झाला मुका कवा बोलला
डोये वटारुनी धाक दावू नको
जीव वाटे तुले हातचा बाहुला
सुख धाडून,परती घे दुखाचा पाहुणाsss
नको ,नको दावू वाकुल्या जीवना sss
धड झिजवुनी म्या गड राखला
नया बदलाचा गावेना दाखला
दिस पालटून जावू दे रे माये
धाय मोकळून अता गया सोकला
आज घामा घामाचा,हिशेब होवू दे जुना sss
नको ,नको दावू वाकुल्या जीवना sss
ढेकला ढेकलात तू मुरला
पोटा लपवून घास चोराला
पैका तयनी जसा बुड बुड्यावाणी
एका सदरयात जन्म झाकला
दम लागते आता,सोबती तू चालनाsss
नको,नको दावू वाकुल्या जीवनाsss
No comments:
Post a Comment