कधी तरी वाटत
मीच का अस जागाव
प्रत्येक नियम धरून
मीच का अस चालावं ?
चालताना हि नियमावली
सोबतीला धराव
स्वतंत्र देशाचा नागरिक
अस स्वतःच का बोलाव ?
रात्र दिवसा काम
करून मी घाम गाळाव
अन त्या घामाचा अर्धा हिस्सा
tax म्हणून मीच का भराव ?
माझ्या प्रत्येक कष्टाचा
हिस्सा असा मीच वाटावा
महिनाअखेरीस उसन काढून
मीच दिवाळी साजरी का कराव ?
जे चालत सर्वकाही
मला हि कळावं
मग उगाच का मी
तोंड दाबून बुक्याचा मार खाव ? .........
No comments:
Post a Comment